कुंडल (ता.पलूस) दि. ४ : तुफान सेनेचे फिल्ड मार्शल ,ज्यांनी कामगार, शेतकरी, कष्टकरी यांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र झटले,कुंडल गावच्या सर्वांनी विकासासाठी शेतीसाठी पाणी पुरवठा संस्था स्थापन करून ज्यांनी कळ्या मातीतील आईला हिरवा शालू नेसवण्याचे कार्य करुण क्रांती कारखाना उभा करुन शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी दर देवून त्यांचे जीवन मान उंचावण्याचा ज्यांनी उत्तुंग काम केले असे क्रांतीअग्रणी डॉ .जी. डी. बापू लाड यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त स्वर्गीय बापुंच्या क्रांती कारखाना येथील समाधीवर पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या कडून अभिवादन करण्यात आले.
क्रांतीअग्रणी स्व.डॉ.जी.डी. बापू लाड यांच्या १०२ व्या जयंती निमित्त मान्यवरांचे कडुन बापुंच्या समाधीस विनम्र अभिवादन यावेळी आ. अरुण लाड, जे. के. जाधव, महेंद्र लाड, उदय लाड, प्रकाश लाड, किरण लाड, दिलीप लाड, प्रमिलाताई लाड, क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड, धनश्रीताई लाड, रणजीत लाड, रत्नदिप लाड, विक्रांत लाड आदी
यावेळी आ.अरुण लाड, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, कृष्णाकाठ उद्योजक उद्योग समूहाचे प्रमुख जे.के.जाधव,उदय लाड, ॲड.प्रकाश लाड, क्रांती दुध संघाचे अध्यक्ष किरण लाड, उद्योजक दिलीप लाड क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, क्रांती इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे रणजीत लाड, रत्नदिप लाड,क्रांती दुध संघाचे विक्रांत लाड, प्रमुख उपस्थित होते
यावेळी क्रांती कारखान्यावरील समाधी स्थळावर बापुंच्या प्रेम करणारे कार्यकर्ते यांची सकाळ पासूनच समाधी स्थळावर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या आजच्या दिनी कारखाणा कार्य स्थळावर ऊस तोड मजुरांच्या मुलांना शिक्षणा पासुन वंचित राहता येवू नये म्हणून आज साखर शाळेचे उद्घाटन करण्यात आले तसेच शेतकरी सभासदांना भाळभरणी यंत्राचे वाटप करण्यात आले
यावेळी व्हि.वाय.पाटील,प्रमिलाताई लाड,धनश्री ताई लाड ,मनस्वीता पाटील, व्हि.टी.पाटील कुरळुप,क्रांती कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील, सरपंच जयराज होवाळ, उपसरपंच अर्जुन कुंभार,सतिश पाटील अंकलखोप, सर्जेराव पवार, राजाराम पाटील , रावसाहेब गोंदिल, पोपटराव सकपाळ, प्रकाश कुंभार, पोपट फडतरे,दिलीप पाटील,भाई संपतराव पवार, धर्मवीर गायकवाड, क्रांतीचे कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे,तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी क्रांती चे सर्व संचालक मंडळ, कुंडल ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य,सत्येश्वर, बसवेश्वर, गणेशवाडी पाणीपुरवठा, कुंडल विकास सोसायटी, क्रांती अर्बन, क्रांतीसिंह नाना पाटील विद्यार्थी वसतिगृह,क्रांती ज्ञानपीठ,क्रांती इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच, क्रांती कारखाना कामगारांची पतसंस्था क्रांती दुध संघ , गांधी एज्युकेशन सोसायटी तसेच क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापु लाड महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी स्टाफ नागरीक, महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰