yuva MAharashtra राज्यस्तरीय व राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 'क्रांती'च्या मल्लांचा दबदबा ; क्रांतिअग्रणीचे अध्यक्ष शरद लाड यांच्या वतीने सन्मान

राज्यस्तरीय व राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 'क्रांती'च्या मल्लांचा दबदबा ; क्रांतिअग्रणीचे अध्यक्ष शरद लाड यांच्या वतीने सन्मान

पलूस : नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड कुस्ती संकुलाच्या मल्लांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये विभागीय कुस्ती स्पर्धा, राज्यस्तरीय कुमार महाराष्ट्र केसरी तसेच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचा समावेश आहे. 
याच पार्श्वभूमीवर क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्यावतीने त्यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशाने क्रांती कुस्ती केंद्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यामध्ये सचिन मुळीक, प्रणव हिंमणे, विश्वजीत पाटील या मल्लांनी रौप्यपदक तर रविराज घार्गे, हर्षद पाटील यांनी कांस्यपदक प्राप्त केले आहे. त्याचबरोबर रुद्रध्वज आडके, धीरज मेटकर, ज्ञानदीप जाधव, वृषभ मंडले, संस्कार वळवडे, जयराज सावंत, विश्वजीत कदम, ओंकार पाटील, प्रणव पवार, सतीश सूर्यवंशी, आशिष मस्के यांची विविध स्पर्धांकरता निवड करण्यात आली आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी क्रांतिअग्रणीचे अध्यक्ष शरद लाड म्हणाले, घरची परिस्थिती बेताची असताना शिक्षणाबरोबरच कुस्ती या क्षेत्रात आवड असणाऱ्या अनेक मल्लांनी या स्पर्धेत विविध कुस्ती प्रकारात अव्वल स्थान मिळवले असून यामध्ये त्यांचे पालक, प्रशिक्षक यांचा मोलाचा वाटा आहे. कुस्ती या क्षेत्रात पदार्पण करत असताना आर्थिक तरतूद करणे आवश्यक असते आणि यासाठी मोठ्या पाठबळाची गरज असते. आर्थिक परिस्थितीची अडचण भेडसावत असणाऱ्या अशा जिद्दी आणि चिकाटी असणाऱ्या मल्लांना क्रांतीकुटुंब नेहमीच पाठबळ देत आले आहे. यापुढेही हे कार्य अखंडपणे सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे.
या सत्कारप्रसंगी कारखान्याचे संचालक, शरद आत्मनिर्भर अभियानचे सर्व संचालक, विविध गावचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड कुस्ती संकुलाच्या मल्लांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये विभागीय कुस्ती स्पर्धा, राज्यस्तरीय कुमार महाराष्ट्र केसरी तसेच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचा समावेश आहे. 
याच पार्श्वभूमीवर क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्यावतीने त्यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशाने क्रांती कुस्ती केंद्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

यामध्ये सचिन मुळीक, प्रणव हिंमणे, विश्वजीत पाटील या मल्लांनी रौप्यपदक तर रविराज घार्गे, हर्षद पाटील यांनी कांस्यपदक प्राप्त केले आहे. त्याचबरोबर रुद्रध्वज आडके, धीरज मेटकर, ज्ञानदीप जाधव, वृषभ मंडले, संस्कार वळवडे, जयराज सावंत, विश्वजीत कदम, ओंकार पाटील, प्रणव पवार, सतीश सूर्यवंशी, आशिष मस्के यांची विविध स्पर्धांकरता निवड करण्यात आली आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी क्रांतिअग्रणीचे अध्यक्ष शरद लाड म्हणाले, घरची परिस्थिती बेताची असताना शिक्षणाबरोबरच कुस्ती या क्षेत्रात आवड असणाऱ्या अनेक मल्लांनी या स्पर्धेत विविध कुस्ती प्रकारात अव्वल स्थान मिळवले असून यामध्ये त्यांचे पालक, प्रशिक्षक यांचा मोलाचा वाटा आहे. कुस्ती या क्षेत्रात पदार्पण करत असताना आर्थिक तरतूद करणे आवश्यक असते आणि यासाठी मोठ्या पाठबळाची गरज असते. आर्थिक परिस्थितीची अडचण भेडसावत असणाऱ्या अशा जिद्दी आणि चिकाटी असणाऱ्या मल्लांना क्रांतीकुटुंब नेहमीच पाठबळ देत आले आहे. यापुढेही हे कार्य अखंडपणे सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे.
या सत्कारप्रसंगी कारखान्याचे संचालक, शरद आत्मनिर्भर अभियानचे सर्व संचालक, विविध गावचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰