पलूसकर शैक्षणिक संकुलाचे स्नेहसंमेलन उत्साहात
पलूस : पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्था पलूस संचलित माधवराव परांजपे शिशुविकास मंदिर व प्राथमिक विद्यामंदिर,पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज या सर्व विभागांचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभास अतिशय उत्साही वातावरणात सुरुवात झाली.
यावेळी सुप्रसिद्ध हास्य कलाकार मनीष आपटे,संस्थापक अध्यक्ष उदय परांजपे ,उपाध्यक्ष विश्वास रावळ,सचिव जयंतीलाल शहा, संचालक संजय परांजपे,सौ.सविता परांजपे,मुख्याध्यापक तानाजी करांडे,संजय सातपुते,प्रदीप कांबळे, माजी मुख्याध्यापक एस्.बी.टोणपे, अशोक कुंभार,विजय कांबळे, सुरेश जाधव, अविनाश चव्हाण, शिक्षक, शिक्षिका, पालक बहुसंख्येने उपस्थित होते. अध्यक्ष उदय परांजपे साहेब यांनी वर्षभरातील कला,क्रीडा ,व सांस्कृतिक यशाचा आढावा घेतला व संस्थेच्या भावी योजनांची माहिती दिली.यावेळी वर्षभरात विविध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा यामध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या आदर्श ,गुणवंत विद्यार्थ्यांचा, सत्कारमूर्तींचा सत्कार प्रमुख मान्यवरांचा हस्ते करण्यात आला.यावेळी चित्रकला,हसतकला,रांगोळी प्रदर्शनाचे ,भरारी हस्तलिखिताचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सुप्रसिद्ध हास्य कलाकार मनीष आपटे म्हणाले, पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे विद्यालयाने केलेली शैक्षणिक प्रगती उल्लेखनीय आहे.विद्यार्थ्याच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी, शैक्षणिक, सांस्कृतिक, सर्वांगीण विकास होण्यासाठी असलेले संस्थेचे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. विद्यार्थ्यांनी आयुष्यात यश मिळवण्यासाठी नेहमी झोकून देवून काम केले पाहिजे. नेहमी मोठी स्वप्ने बघा. हास्य आणि टाळ्या मानवी मनाच्या भावना आहेत. शालेय जीवनातील ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर टिकते आपल्या विनोदी गाणी गप्पा वेगवेगळ्या नेत्यांचे , कलाकारांच्या आवाजाची मिमिक्री सादर केली शाब्दिक कोट्यानी मुले खळखळून हसवली. आपल्या मिमिक्रेनी सर्वांना मंत्रमुग्ध केले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय बळीराम पोतदार, बक्षीसपात्र मुलांचे यादी वाचन आनंदराव सावंत , सूत्रसंचालन सौ. सायली मेरू आभार मुख्याध्यापक तानाजी करांडे यांनी मानले.यावेळी प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
पलूसकर शैक्षणिक संकुलाचे स्नेहसंमेलन प्रसंगी मनीष आपटे उदय परांजपे, जयंतीलाल शहा, विश्वास रावळ,तानाजी करांडे
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰