पलूस दि. ०४ : जि.प.माजी अध्यक्ष व पलुस कडेगाव विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे युवा नेते संग्रामसिंह संपतराव देशमुख यांना विधानपरिषदेवर संधी देऊन भाजपा ने त्यांच्या नेतृत्वाला अधिक ताकत देण्याची भुमिका घ्यावी अशी मागणी पलुस कडेगाव तालुक्यातील भाजपा कार्यकर्ता मध्ये होत आहे.
महाराष्ट्रात 2024 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यातील पलुस-कडेगाव विधानसभा मतदार संघामध्ये बलाढ्य असणाऱ्या कदम - लाड गटापुढे संग्रामसिंह देशमुख यांनी १ लाख उच्चांकी मते घेतली आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात महाआघाडीतून काँग्रेसचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम व महायुती मधून भाजपाचे उमेदवार संग्राम सिंह देशमुख यांच्यामध्ये झालेल्या लढतीची चर्चा होत आहे. जिल्हा परिषद सदस्य असताना केलेल्या कामामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये त्यानी विश्वास संपादन केला आहे. पराभव पदरी पडला असला तरी संघर्ष करीत त्यांनी कड़वी झुंज दिली आहे. त्यामुळे संग्रामसिंह देशमुख यांच्या सारख्या उमद्या नेतृत्वाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विधानपरिषदेवर संधी देऊन त्यांचे हात बळकट करावे. पलुस कडेगाव मतदार संघामध्ये भाजपाचा गड़ अबाधित राखण्यासाठी भाजपने त्यांना राजकीय ताकत द्यावी अशा भावना कार्यकर्ता व्यक्त करीत आहेत.
देशमुख हे जि.प.अध्यक्ष असताना त्यांनी जिल्ह्यामध्ये भाजपाचे संघटन वाढविण्यामध्ये मोठी भुमिका घेतली आहे .तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी आदर्शवत काम केले आहे .विविध संस्थांच्या माध्यमातून देशमुख हे काम करीत असुन सामान्यातील सामान्य माणसाबरोबर त्यांची नाळ जोडलेली आहे. प्रचंड जनसंपर्क व कामाची हातोटी यामुळे देशमुख सारख्या उमद्या नेतृत्वाला विधानपरिषदेवर संधी दिली गेल्यास भाजपाची ताकत वाढेल . निवडणुकीनंतर संग्राम देशमुख देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन राज्यात मजबूत सरकार आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. लवकरच तुमचा योग्य तो सन्मान केला जाईल असे फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांना विधानपरिषदेवर संधी देऊन त्यांचा सन्मान करावा व पलूस-कडेगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याची संधी द्यावी अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰