yuva MAharashtra युवा आयकॉन स्पर्धेत सहभागी व्हा - जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर

युवा आयकॉन स्पर्धेत सहभागी व्हा - जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर



        सांगलीदि.  (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील युवक कल्याण क्षेत्रात काम केलेल्या तसेच युवांना प्रभावित करणारे कार्य केलेले १५ ते २९ वयोगटातील ५ युवा आयकॉन विभागस्तरीय युवा महोत्सवासाठी निवडण्यात येणार आहेत. या करिता दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी युवा आयकॉन या बाबीमध्ये जास्तीत जास्त युवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे.

            यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये अर्ज उपलब्ध असून अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे यांच्याशी ९६७३४५१११५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. युवकांचा सर्वांगीण विकास करणेसंस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी दरवर्षी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय द्वारे राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात येतो.

राष्ट्रीय स्तरावरील युवा महोत्सवामध्ये महाराष्ट्र राज्याचा संघ पाठविण्यात येणार असून यासाठी जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर या क्रमाने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. सन २०२४-२५ या वर्षासाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना Innovation in Science and Technolagy" या बाबीचा संकल्पना आधारित बाबीमध्ये समावेश असून स्पर्धात्मक बाबीमध्ये समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, कथा लेखनचित्रकलावक्तृत्त्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी)कवितायुथ आयकॉन या बाबींचा समावेश करण्यात आलेला असल्याचे श्री. बोरवडेकर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰