सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : दहावी व बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवत्ता वाढविणे आणि परीक्षा कॉपीमुक्त व गैरप्रकार मुक्त करण्याच्या पार्श्वभूमिवर कोल्हापूर विभागीय मंडळाने जिल्हानिहाय दोन टप्प्यात शाळाप्रमुखांच्या बैठकांचे आयोजन केले आहे. सांगली येथील सहविचार सभा विलिंग्डन महाविद्यालयातील वेलणकर सभागृहात गुरूवार, दि. 12 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. सकाळ सत्रात जत, वाळवा, शिराळा, खानापूर व आटपाडी या पाच तालुक्यांची तर दुपार सत्रात सांगलीसह मिरज, तासगाव, पलूस, कवठेमहांकाळ व कडेगाव या तालुक्यांची सहविचार सभा होणार आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाचे नूतन अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा होणार आहे.
शाळा परिसर व वर्गातील सीसीटीव्ही, दिव्यांग विद्यार्थ्यांबाबतची माहिती, नोंदणी व शिक्षण संक्रमण मासिक, चालू वर्षीच्या परीक्षार्थी संख्येत झालेली वाढ किंवा घट, राज्य मंडळ व विभागीय मंडळ संकेतस्थळाचा वापर, मंडळाच्या मोबाईल ॲपचा विद्यार्थी व शिक्षकांकडून वापर, मागील वर्षाच्या निकालाची टप्पेनिहाय माहिती, उल्लास साक्षरता कार्यक्रमातील शाळेचा सहभाग, स्कूल प्रोफाइल, परीक्षक - नियामक, योग्यता व पात्रता प्रमाणपत्र, प्रात्यक्षिक परीक्षेची पूर्वतयारी, शास्त्रीय व लोककला संस्थांची माहिती, खेळाडू एनसीसी स्काऊट गाईड मधील वाढीव गुणांबाबत, प्रीलिस्ट दुरुस्ती, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, प्रयोगवही बाबतची माहिती, टंचाईग्रस्त व दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या फी प्रतिपूर्तीबाबत यासह अनुषंगिक बाबींची शाळाप्रमुख यांनी पूर्वतयारी करून माहितीसह उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे मंडळाने कळवले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰