सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : जिल्ह्याच्या विकासासाठी विविध उत्पादनांची निर्यात वाढणे ही काळाची गरज आहे, असे मत निर्यात प्रचालन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मान्यवरांनी व्यक्त केले.
निर्यात वाढीसाठी राज्य व केंद्र शासनाच्या वतीने उद्योगांना असलेल्या सोयी - सुविधा, सवलती, धोरणे उद्योग घटकांना माहिती होवून याव्दारे निर्यात वाढीला चालना मिळावी यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने निर्यात प्रचालन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यशाळेस उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी, तहसिलदार लीना खरात, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक विश्वास वेताळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, उद्योजक उपस्थित होते.
राज्यामध्ये निर्यात क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीचे लक्ष साध्य करण्यासाठी आणि निर्यात वाढीला प्रत्येक जिल्ह्याला उत्तरदायी बनविण्यासाठी राज्याकडून केंद्र शासनाच्या “जिल्हा हे निर्यात केंद्र” उपक्रमाला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
या कार्यशाळेत केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचलन समितीचे सदस्य,सांगली मिरज औद्योगिक संघटनेचे संजय अराणके व कृष्णा व्हॅली औद्योगिक संघटनेचे रमेश आरवाडे, निर्यात संबंधी कामकाज करणारे उद्योजक योगेश राजहंस तसेच इंजिनियरिंग एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे सी.एच.नाडीयार, कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणचे पी.ए.बामणे व परकीय व्यापार महासंचालनालयचे शिध्दांत गायकवाड, ई ॲण्ड वाय कन्सल्टन्सीचे श्रीजीत नायर आदि अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेस निर्यातदार व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰