yuva MAharashtra थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यावा - किरण गिऱ्हे

थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यावा - किरण गिऱ्हे



सांगलीदि. 18, (जि. मा. का.) :  वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळपैलवान कै. मारूती चव्हाण वडार आर्थिक विका महामंडळ व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाकडील थेट कर्ज योजनेचा विमुक्त जातीभटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आवाहन किरण गिऱ्हे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

            वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ अंतर्गत पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ (मुख्य कंपनी) सांगली या कार्यालयामार्फत एक लाख रूपये थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असूनएक लाख रूपये थेट कर्ज योजनेमध्ये संपूर्ण कर्ज महामंडळाकडून दिले जाणार आहे. त्याची 2085/- रूपये च्या नियमित 48 समान मासिक हप्त्यांमध्ये परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकित हप्त्यांवर द.सा.द.शे. 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल, असे पत्रकात म्हटले आहे.

नियम, अटी व अधिक माहितीसाठी महामंडळाचे सांगली जिल्हा कार्यालयवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनजुना बुधगांव रोडसंभाजी नगरदूरध्वनी क्रं. 0233-2376383 येथे संपर्क करावा.


हेही पहा --

https://youtu.be/GOjot_OhU5s?si=2zP_fWPjg5FDKhu4


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰