yuva MAharashtra आरोग्यविषयक माहिती : सोयाबीनचे आयुर्वेदिक फायदे

आरोग्यविषयक माहिती : सोयाबीनचे आयुर्वेदिक फायदे




आरोग्यविषयक माहिती : 


           सोयाबीनचे आयुर्वेदिक फायदे


 
रक्ताभिसरण सुधारते


सोयाबीन खाण्याचे फायदे  असे आहेत की, सोयाबीनमध्ये लोह आणि कॉपर हे दोन घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. ज्यामुळे तुमच्या शरीरात पुरेशा लाल रक्त पेशी निर्माण होतात. तज्ञ्जांच्या मते लाल रक्त पेशींची निर्मिती योग्य प्रमाणात झाल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. यासाठीच रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आहारात पुरेसे सोयाबीन प्रत्येकाने खायला हवे. 

गरोदरपणात उपयुक्त
 
सोयाबीनमध्ये फॉलिक अॕसिड आणि बी कॉप्लेक्स भरपूर प्रमाणात असते. जे गर्भावस्थेमध्ये महिलांच्या शरीराला आवश्यक असते. गर्भवती महिलांनी सोयाबीनचा आहारात समावेश केल्यास त्यांच्या शरीराला हे पोषक घटक मिळतात. गर्भाच्या वाढ आणि विकासासाठी आणि सुलभ प्रसूतीसाठी गर्भवती महिलांच्या आहारात सोयाबीन असायला हवे. 

ह्रदयाचे आरोग्य उत्तम राहते

सोयाबीन खाण्यामुळे ह्रदयाच्या अनेक समस्या कमी होतात. ह्रदयाचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल कमी आणि गुड कोलेस्ट्रॉल योग्य प्रमाणात असण्याची गरज असते. कारण कोलेस्ट्रॉल मुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो आणि ह्रदयाच कार्य सुरळीत होत नाही. सोयाबीनमध्ये गुड कोलेस्ट्रॉल असते. ह्रदयाचे कार्य चांगले राहण्यासाठी शरीराला याचा चांगला फायदा होतो. सोयाबीनमध्ये असलेल्या लेसीथीनमुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साचून राहत नाही. म्हणूनच ह्रदयविकार असलेल्या लोकांनी सोयाबीनचा आहारात अवश्य वापर करावा. 

हाडांचे आरोग्य सुधारते
 
सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स आणि कॅल्शिअम असतात. हाडे मजबूत होण्यासाठी याची शरीराला गरज असते. ज्या लोकांना आर्थ्राटीस सारखे गंभीर हाडांचे विकार  आहेत. त्यांनी आहारात सोयाबीनचा वापर केल्यास चांगला आराम मिळू शकतो. शिवाय सोयाबीनमध्ये फॅट्स आणि कॅलरिज कमी असतात. ज्यामुळे तुमचे वजन वाढत नाही.  एवढंच नाही तर अॕनिमिया अथवा अशक्तपणा असलेल्या लोकांनी नियमित सोयाबीनची भाजी खाल्लास चांगला फायदा होऊ शकतो. कारण त्यामुळे त्यांच्या शरीरातील लाल रक्त पेशीतर वाढतातच शिवाय हाडेही मजबूत होतात. शरीराचा योग्य विकास करण्यासाठी सोयाबीन हा एक चांगला पर्याय आहे. कारण त्यामुळे तुमच्या मांसपेशी, नखं, हाडे, केस मजबूत होतात.

संकलन-

निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰