yuva MAharashtra ऊस वाहतूकीसाठी रिफ्लेक्टर ; अपघात टाळण्यासाठी 'क्रांती' कारखान्याचा पुढाकार

ऊस वाहतूकीसाठी रिफ्लेक्टर ; अपघात टाळण्यासाठी 'क्रांती' कारखान्याचा पुढाकार




कुंडल (ता.पलूस) :  सध्या जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू झाला आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघातांची संख्या वाढते. ऊस वाहतूक करणारी वाहने अनेकदा रस्त्यावर उभी असतात. त्याच्या पाठीमागे रिफ्लेक्टर नसल्यामुळे रात्रीची पाठीमागून येणारी वाहने थांबलेल्या वाहनांवर आदळतात. यात लोकांचा बळी जातो. तर काहींजण कायमस्वरूपी जायबंदी होतात. हे अपघात थांबवण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली, बैलगाड्यांना रिफ्लेक्टर बंधनकारक असल्याने क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सह. कारखाना, कुंडल येथे कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड व कुंडल पोलीस स्टेशनचे API जयसिंग पाटील यांच्या उपस्थित ऊस वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्याचा उपक्रम पार पडला. यावेळी कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच वाहनचालक उपस्थित होते.


ऊस वाहतूक करणारे वाहनास छोटे रिफ्लेक्टर तसेच कापडी लाल रंगाचे रिफ्लेक्टर बसवणे, दारू पिऊन वाहन न चालवणे, ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजात गाणी न लावणे, वाहतुकीचे सर्व नियम पाळणे, कारखान्याच्या आजूबाजूला रस्त्यावर वाहन लावताना सार्वजनिक वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत जयसिंग पाटील यांच्याकडून वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यात आले. 
साखर कारखान्याचे मॅनेजमेंट स्टाफला त्यांच्याकडे ऊस वाहतुकीसाठी नोंद असलेल्या व ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना व बैलगाड्यांना रिफ्लेक्टर वाटप करावे, याबाबत सूचना देण्यात आल्या.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰