सांगली : वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन च्या वतीने मा. अप्पर कामगार आयुक्त पुणे कार्यालयास सोमवार दिनांक ०२/०१२/२०२४ रोजी युनियनच्या शिष्ट मंडळाने विभागी आयुक्त कार्यालय सहायक आयुक्त मा. टि. एस. अत्तार यांना निवेदन सादर केले.
निवेदनात ०६/११/२०२४ रोजीचा मुंबई उच्च न्यायालयाने रिट पीटिशन क्र .३३५९७ /२०२४ नुसार वरील दिलेल्या निर्णयाने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने आपले कामकाज पुर्ववत ठेवण्याचे आदेश दिले होते. तरी मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अंमलबजावणी न करता, कामगार प्रतिनिधी तसेच मालक प्रतिनिधी यांची नियुक्ती नसताना मनमानी पद्धतीने नियमात बदल करून कामकाज चालवले जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंडळाने कामकाज पुर्ववत ठेवणे आवश्यक होते पण मुंबई उच्च न्यायालयाचा अपमान करत मंडळाने निर्णया आदिची कामकाजची पध्दत तशीच न ठेवता व कोणत्याही बांधकाम कामगार संघटना किंवा बांधकाम कामगारांना पुर्व कल्पना न देता कामकाजाचा पुर्ण चेहरामोहराच बदलून टाकला.
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या या गलथान कारभारामुळे व अनाकलनीय नियम व अटी-शर्ती लागू केल्यामुळे बांधकाम कामगारांना आपले नोंदणी अर्ज, नुतनीकरणाचे अर्ज व लाभाचे अर्ज भरण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण केले आहेत.
मनमानी पद्धतीने कंत्राटी भरती प्रक्रिया राबून अकुशल व अपात्र उमेदवार, नात्यागोत्यातील व लागेबांधे असणार्या लोकांची भरती करून. निवड प्रक्रियेचे सर्व नियम धाब्यावर बसवून. अपात्र उमेदवारांची निवड करण्यात आली. अशा गलथान कारभारामुळे मंडळाची संपूर्ण घडीच विस्कटण्याचे काम मंडळाच्या सचिवांनी केले आहे.
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कायद्या अंतर्गत कलम १२ व १३ नुसार बांधकाम कामगार स्वतः आपले सर्व अर्ज मंडळाच्या साईट वर भरू शकत होता. पण तो त्याचा हक्क मंडळाने हिरावून घेतला आहे.
तालुका कामगार सुविधा केंद्रात अकुशल कंत्राटी कामगार व स्वतः अर्ज सादर करण्याचा अधिकार हिरावून घेतल्यामुळे आणि आधिचे मंडळाच्या ढिसाळ कामकाजा मुळे बेजार झालेला कामगार सध्या हवालदिल झाला आहे.
निवेदनात महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती व इतर सहा कामगार संघटना यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कामकाज पुर्ववत झाले नाहीतर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अवमान केल्याप्रकरणी मा. विवेक कुंभार, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा सचिव यांच्या विरुद्ध याचिका दाखल करण्याचा इशाराचे निवेदन वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे यांनी दिला आहे. यावेळी, वंचित बहुजन आघाडीचे पूणे जिल्ह्यातील जेष्ठ नेते, विलास वनशीव तसेच महिला आघाडीच्या जेष्ठ नेत्या निर्मलाताई वनशीव यांच्या बरोबर पूणे जिल्ह्यातील कामगार नेते किशोरभाऊ कांबळे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे सर आदी उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰