yuva MAharashtra पलूसकर शैक्षणिक संकुलाचे वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न. .... तहसिलदार दिप्ती रिठे सपोनि सुशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

पलूसकर शैक्षणिक संकुलाचे वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न. .... तहसिलदार दिप्ती रिठे सपोनि सुशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती




    पलूस दि. १७  :  पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्था पलूस संचलित माधवराव परांजपे शिशुविकास मंदिर व प्राथमिक विद्यामंदिर ,पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज या सर्व विभागांचे पारितोषिक वितरण समारंभ सोहळा अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला..



    यावेळी तहसिलदार दिप्ती रिठे-जाधव , सपोनि सुशांत पाटील,संस्थापक अध्यक्ष उदय परांजपे , सचिव जयंतीलाल शहा, संचालक संजय परांजपे, मुख्याध्यापक तानाजी करांडे,केंद्रप्रमुख राम चव्हाण, मारुती शिरतोडे ,सामाजिक कार्यकर्ते रामानंद पाटील,अशोक कुंभार,विजय कांबळे,किरण शहा, सुरेश जाधव,अविनाश चव्हाण  उपस्थित होते.


      मुख्याध्यापक तानाजी करांडे यांनी वर्षभरातील कला,क्रीडा ,व सांस्कृतिक यशाचा आढावा घेतला.यावेळी वर्षभरात विविध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा यामध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या आदर्श ,गुणवंत विद्यार्थ्यांचा,शिक्षकांचा सत्कार करण्यात आला..

    यावेळी बोलताना सपोनी सुशांत पाटील म्हणाले म्हणाले विद्यार्थ्यांनी शालेय वयात मोबाईल पासून दूर राहिले पाहिजे. विविध स्पर्धामध्ये सहभाग घेतला पाहिजे. जी माणसे यशस्वी झाली त्यांची चरित्रे अभ्यासा. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे समाजाचे शाळेचे ऋण कधीही विसरू नये आळस झटकून कामाला लागा आई-वडिलांना आपला अभिमान वाटेल असे काम करा असे सांगितले.


तहसिलदार दिप्ती रिठे-जाधव म्हणाल्या, पलूसकर शिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद व उल्लेखनीय आहे.  
विद्यार्थ्यांनी आज्ञाधारक असले पाहिजे.आई-वडील आणि गुरुजन यांचा  सल्लाच तुमचे जीवन समृद्ध करेल . पालक जे सांगतात ते लक्षपूर्वक आचरणात आणा असे सांगितले. 


   बक्षीसपात्र मुलांचे यादी वाचन सुरेश जाधव, गजानन पाटील यांनी परिचय बाळासाहेब चोपडे, सूत्रसंचालन बळीराम पोतदार, आभार प्रज्ञा बिराज यांनी मानले..यावेळी प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते..

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰