पलूस दि. 8 : श्री समर्थ धोंडीराज महाराज समाधी मंदिर पलूस ते सदगुरु श्रीक्षेञ औदुंबर, दत्त मंदिर औदुंबर नामसाधना पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.पलूस ते औदुंबर पायी दिंडी सोहळ्यात महिला भाविकाची उपस्थिती लक्षणीय होती.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय , तुकाराम महाराज की जय,विविध अभंग, भक्ती गीते नाम जपाच्या गजरात दिंडी सोहळ्यात सर्व भाविक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते.
रविवार दि. ८ रोजी सकाळी ७ वा. पलूस येथून प्रस्थान ०९.०० वाजता आमणापूर येथे चहापाणी व विसावा,दुपारी १२.३० वाजता औदुंबर येथे आरती,महाप्रसादानंतर दिंडीची सांगता झाली. या दिंडी सोहळ्यात पलूस मधील व्यापारी उद्योजक,शेतकरी ,भाविक सहभागी झाले होते. श्री समर्थ धोंडीराज महाराज सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील, सर्व सहकारी यांच्यावतीने या दिंडी सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील म्हणाले सर्व साधाकांच्या मध्ये सेवाभाव वाढीस लागावा.नाम साधनेचे महत्त्व सर्वांना कळावे यासाठी याचे आयोजन प्रत्येक महिन्याला अमावस्येनंतर येणाऱ्या रविवारी केले जाते. दिवसेंदिवस या सोहळ्याला वाढता प्रतिसाद लाभत आहे. याबद्दल सर्व ग्रामस्थांना धन्यवाद दिले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰