yuva MAharashtra देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नव्या सरकारचा शपथविधी संपन्न

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नव्या सरकारचा शपथविधी संपन्न




मुंबई दि. 5 : महाराष्ट्राच्या 14 व्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.



महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ते बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला.

या शपथविधी सोहळ्याला महायुतीचे राज्यभरातील समर्थक, कार्यकर्ते उपस्थित होते. सिनेसृष्टीमधील दिग्गजांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली.




"मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..." भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.


एकनाथ शिंदे पहिल्यांदा उपमुख्यमंत्री

शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी अखेर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होणार की नाही याबाबतच्या चर्चा सुरु होत्या. त्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत आणि शिवसेनेच्या आमदारांची मागणी मान्य करत एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. 2014-2019 या काळात प्रथम महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते, त्यानंतर राज्य सरकारमध्ये नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये देखील ते नगरविकास मंत्री होते. यानंतर शिवसेना आणि भाजपचं सरकार स्थापन झालं तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले आहेत.



अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी सहाव्यांदा शपथ घेतली. 2019-2024 या कालावधीतील तीन राज्य सरकारांमध्ये अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होते. अजित पवार 2010 मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले होते. आज त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰