yuva MAharashtra महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर



सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेअसे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव र. प्र. ओतारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक अनुक्रमे परीक्षासंवर्गपरीक्षेचे स्वरूपजाहिरातपूर्व परीक्षा दिनांक व मुख्य परीक्षा दिनांक व कंसात निकालाचा अंदाजित महिना पुढीलप्रमाणे. 

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रितसेवा संयुक्त परीक्षा-2024 -  सहायक कक्ष अधिकारीराज्य कर निरीक्षकपोलीस उपनिरीक्षक व दुय्यम निबंधक (श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षकवस्तुनिष्ठ बहुपर्यायी, 9 ऑक्टोबर 2024, पूर्व परीक्षा 5 जानेवारी 2025 (एप्रिल 2025), मुख्य परीक्षा 1 जून 2025 (सप्टेंबर 2025).

महाराष्ट्र अराजपत्रित गट-क सेवा संयुक्त परीक्षा-2024 - उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, दुय्यक निरीक्षक राज्य उत्पादन शुल्कतांत्रिक सहायक विमा संचालनालयकर सहायक, बेलिफ व लिपीक, लिपीक-टंकलेखक व सहायक मोटार वाहन निरीक्षक, वस्तुनिष्ठ बहुपर्यायीऑक्टोबर 2024, पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 (मे 2025). मुख्य परीक्षा 29 जून 2025 (ऑक्टोबर 2025).

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा-2024 -  दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्गवस्तुनिष्ठ बहुपर्यायी, डिसेंबर 2024, पूर्व परीक्षा 16 मार्च 2025 (जुलै 2025).

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-2024 -  दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, पारंपरिक / वर्णनात्मक, मुख्य परीक्षा-13 सप्टेंबर 2025 (जानेवारी 2026).

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा-2024 - महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा-2024, शासनाच्या विविध विभागातील गट-अ व गट-ब, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, 29 डिसेंबर 2023, पूर्व परीक्षा 1 डिसेंबर 2024 (मार्च 2025).

राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024 - एकूण 35 संवर्गपारंपरिक/वर्णनात्मक तसेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मुख्य परीक्षा 26 एप्रिल 2025, सकाळ भाषा पेपर-1दुपार भाषा पेपर-2, 27 एप्रिल 2025, सकाळ सामान्य अध्ययन-1दुपार सामान्य अध्ययन-2, 28 एप्रिल 2025, सकाळ सामान्य अध्ययन-3दुपार सामान्य अध्ययन-4, निकालाचा अंदाजित महिना ऑक्टोबर 2025.

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-2024 - सहायक वनसंरक्षक गट-अवनक्षेत्रपाल गट-बपारंपरिक/वर्णनात्मकमुख्य परीक्षा 10 मे 2025, सकाळ कृषि अभियांत्रिकी/रासायनिक अभियांत्रिकी/स्थापत्य अभियांत्रिकी/यांत्रिकी अभियांत्रिकीदुपार कृषि/पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान, 11 मे 2025, सकाळ – वनस्पतिशास्त्रदुपार प्राणिशास्त्र, 13 मे 2025 - सकाळ – गणितदुपार सांख्यिकी, 14 मे 2025 - सकाळ -भूशास्त्रदुपार – वनशास्त्र, 15 मे 2025 – सकाळ – रसायनशास्त्र, दुपार – भौतिकशास्त्र, (निकालाचा अंदाजित महिना -ऑक्टोबर 2025).

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2024 - सहायक कार्यकारी अभियंता गट-अ (स्थापत्य)सहायक अभियंता गट-अ (स्थापत्य)सहायक अभियंता गट-ब (स्थापत्य) श्रेणी-2उप विभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट-अ व जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट-बपारंपरिक/वर्णनात्मकमुख्य परीक्षा 18 मे 2025, सकाळ - पेपर क्रमांक 1दुपार पेपर क्रमांक 2 (निकालाचा अंदाजित महिना -ऑक्टोबर 2025).

महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-2024 -  कृषि अधिकारी गट अकृषि अधिकारी गट बकृषि अधिकारी गट ब कनिष्ठपारंपरिक/वर्णनात्मकमुख्य परीक्षा 18 मे 2025,  सकाळ - पेपर क्रमांक १दुपार पेपर क्रमांक 2 (निकालाचा अंदाजित महिना -ऑक्टोबर 2025).

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा-2025 - राज्य सेवा-35 संवर्गयांत्रिकी अभियांत्रिकी सेवाविद्युत अभियांत्रिकी सेवास्थापत्य अभियांत्रिकी सेवाविद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवाकृषि सेवासहायक नियंत्रक वैधमापनशास्त्रअन्न व औषध प्रशासकीय सेवावनसेवावस्तुनिष्ठ बहुपर्यायी, जानेवारी 2025, पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर 2025, अंदाजित निकालाचा महिना - जानेवारी 2026.

राज्य सेवा मुख्य परीक्षा-2025 - एकूण 35 संवर्गपारंपरिक/वर्णनात्मकमुख्य परीक्षा भाषा पेपर 1 – मराठी व भाषा पेपर 2 – इंग्रजी, निबंध, सामान्य अध्ययन-1 व सामान्य अध्ययन-2, सामान्य अध्ययन-3 व सामान्य अध्ययन-4, वैकल्पिक विषय-पेपर क्रमांक 1  वैकल्पिक विषय-पेपर क्रमांक 2 , मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2025 - सहायक अभियंता यांत्रिकी गट-ब श्रेणी-2पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी / विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2025 - सहायक अभियंता विद्युत गट-ब श्रेणी-2पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2025 - सहायक कार्यकारी अभियंता गट-अ (स्थापत्य)सहायक अभियंता गट-अ (स्थापत्य)सहायक अभियंता गट-ब (स्थापत्य) श्रेणी-2, उप विभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट-अ व जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट-बपारंपरिक / वर्णनात्मक, मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-2025 -  कृषि अधिकारी गट अकृषि अधिकारी गट बकृषि अधिकारी गट ब कनिष्ठपारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा-2025 - सहायक आयुक्त अन्न तथा पदनिर्देशित अधिकारी गट-अ व अन्न सुरक्षा अधिकारी गट-बपारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा-2025 – ‍ निरीक्षक वैधमापन गट-बपारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-2025 – ‍ सहायक वनसंरक्षक गट-अ व वनक्षेत्रपाल गट-बपारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा-2025 - दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथमवर्ग, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, ऑगस्ट 2025,  पूर्व परीक्षा 12 ऑक्टोबर 2025, निकालाचा अंदाजित महिना जानेवारी 2026.

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-2025 - दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथमवर्ग, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रितसेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 -  सहायक कक्ष अधिकारीराज्य कर निरीक्षकपोलीस उपनिरीक्षक व दुय्यम निबंधक (श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षकवस्तुनिष्ठ बहुपर्यायी, जुलै 2025, पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबर 2025, निकालाचा अंदाजित महिना फेब्रुवारी 2026.

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रितसेवा संयुक्त मुख्य परीक्षा-2025 -  सहायक कक्ष अधिकारीराज्य कर निरीक्षकपोलीस उपनिरीक्षक व दुय्यम निबंधक (श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षकवस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 - उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, दुय्यक निरीक्षक राज्य उत्पादन शुल्कतांत्रिक सहायक विमा संचालनालयकर सहायक, बेलिफ व लिपीक, लिपीक-टंकलेखक व सहायक मोटार वाहन निरीक्षक, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, सप्टेंबर 2025, पूर्व परीक्षा 30 नोव्हेंबर 2025, निकालाचा अंदाजित महिना मार्च 2026.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-2025 - उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, दुय्यक निरीक्षक राज्य उत्पादन शुल्कतांत्रिक सहायक विमा संचालनालयकर सहायक, बेलिफ व लिपीक, लिपीक-टंकलेखक व सहायक मोटार वाहन निरीक्षक, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2025 – सहायक मोटार वाहन निरीक्षक, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी विहित वेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त होईल या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संबंधित परीक्षेची परीक्षा योजनाअभ्यासक्रमनिवड पध्दत इत्यादी तपशिल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे / येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल. संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/अधिसूचनेव्दारे उपलब्ध करून देण्यात येईलअसे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰