yuva MAharashtra इस्लामपूर येथे नियोजित शासकीय योजनांचे महाशिबीर यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे - प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा

इस्लामपूर येथे नियोजित शासकीय योजनांचे महाशिबीर यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे - प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा



 

        सांगलीदि. 4, (जि. मा. का.) : राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या कार्यक्रमाप्रमाणे शासकीय योजनांची जनजागृती करण्यासाठी व लाभार्थींना लाभ देण्याच्या अनुषंगाने दि. 11 जानेवारी 2025 रोजी इस्लामपूर येथील सर्जेराव यादव मल्टिपर्पज हॉल येथे महाशिबीर आयोजित करण्यात येत आहे. या महाशिबीरामध्ये संबंधित विभागांनी त्यांच्याकडील योजनांची माहिती देणारे स्टॉल लावावेत. काही लाभार्थींना मान्यवरांच्या हस्ते लाभ वितरणही करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सर्वांनी हे महाशिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावेअसे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष पी. के. शर्मा यांनी केले.




        इस्लामपूर येथे 11 जानेवारी 2025 रोजी महाशिबीराच्या आयोजनाच्या अनुषंगाने पूर्वतयारीसाठी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या बैठक कक्षात जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुखांची बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर गिरीजेश कांबळेउप वनसंरक्षक नीता कट्टेजिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकरप्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे विभाग प्रमुखन्यायालयाचे न्यायाधीशअधिकारी उपस्थित होते.



        जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणालेविविध शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली देण्यासाठीलाभार्थींना लाभ देण्यासाठी व कायदेविषयक सल्ला देणे या हेतूने हे महाशिबीर घेण्यात  येत आहे. सर्व शासकीय विभागांनी त्यांच्याकडील योजनांचे या महाशिबीरामध्ये स्टॉल लावावेत. प्रत्येक विभागाला किमान  एक स्टॉल दिला जाईल. सार्वजनिक बांधकाम  विभागाने बैठक व्यवस्थास्टॉल आदींबाबत आवश्यक कार्यवाही करावीआरोग्य विभागाने महाशिबीराच्या ठिकाणी आरोग्य व्यवस्थारूग्णवाहिकाबाबत कार्यवाही करावीपरिवहन विभागाने लाभार्थींना महाशिबीराच्या ठिकाणी आणण्यासाठी आवश्यक बसेसची व्यवस्था करावी. पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा, अन्य विभागांनी त्यांना नेमून दिलेले काम चोखपणे पार पाडून हे महाशिबीर यशस्वी करावेअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.





यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर गिरीजेश कांबळे यांनी महाशिबीर आयोजनाबाबतची माहिती दिली.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰