वांगी : रविवार, दि. ०८/१२/२०२४ रोजी कराड तालुक्यातील बनवडी गावचे संदीप आनंदा सुपनेकर हे आपल्या चार चाकी गाडी गाडीमधून (MH11 AK 4262) कुपवाड (सांगली) येथे आजारी पाहुण्याला भेटायला गेले होते. तिकडून परत येत असताना वांगी-सोनहिरा कारखाना रस्त्यावर त्यांच्या गाडीने अचानक पेट घेतला. गाडीने पेट घेतला आहे हे लक्षात येताच संदीप यांनी तात्काळ गाडीतील सर्व ६ प्रवाशांना खाली उतरवले.
रस्त्याच्या शेजारीच जवळपास ४०-५० एकर ऊसाचे क्षेत्र असल्याने आगीचा वाढता वेग पाहता संपूर्ण ऊसाचे नुकसान होईल, अशी भीती इथल्या शेतकऱ्यांना वाटू लागली. अशावेळी प्रसंगावधान दाखवून वांगी गावचे युवा प्रगतशील शेतकरी रविंद्र मोहिते-पाटील यांनी क्रांती साखर कारखाना, कुंडल यांच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला.
मात्र तोपर्यंत गाडी जाळून खाक झालेली. आगीने रौद्ररूप धारण केले होते. तात्काळ सेवा देण्यात नावलौकिक असणारे क्रांती कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ अग्निशामक बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले व उर्वरीत आग आटोक्यात आणली. यामुळे रस्त्यालगत असणाऱ्या ऊस क्षेत्रावरील संकट टळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अधिक तपास चिंचणी-वांगी पोलीस करत आहेत.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰