भिलवडी (ता़.पलूस) दि. २२ : माळवाडी ता.पलूस येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश प्रकाश कांबळे यांचे आज रविवार दि. २२ डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते मृत्यूसमयी ४१ वर्षांचे होते.
माळवाडी ग्रामपंचायतचे सेवानिवृत्त आरोग्य सेवक कै.प्रकाश कांबळे यांचे ते पुत्र होत.
प्रत्येक सामाजिक , संस्कृतीक , शैक्षणिक व क्रीडा उपक्रमात हिरीरीने भाग घेणारा तरुण कार्यकर्ता , चॅलेंजर्स ग्रुपचा जुना जाणता सक्रिय खेळाडू व कृष्णाकाठ प्रीमियर लीगचा प्रमुख आधारस्तंभ अशी त्यांची ओळख होती.
त्यांच्या पश्चात पत्नी , १ मुलगा व १ मुलगी असा छोटासा परीवार आहे.
सतीश कांबळे यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रक्षाविसर्जन --
मंगळवार दिनांक २४/१२/२०२४ रोजी
सकाळी ठीक 10:00 वाजता
कृष्णा घाट भिलवडी येथे आहे.
सामाजिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा कार्यकर्ता कायमचा काळाच्या पडद्याआड गेला. या दुःखद प्रसंगात " द जनशक्ती माध्यम समूह " कांबळे कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, तसेच स्व. सतीश कांबळे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच प्रार्थना!
सर्वांचा एक चांगला मित्र आणि सहकारी हरपला.माळवाडी भिलवडी येथील सर्व मित्र परिवाराकडून त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली...!
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰