सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली या कार्यालयाचे कालबाह्य झालेले अभिलेख निर्लेखित करून नष्ट करण्याची कार्यवाही करावयाची आहे व सदर वेस्ट पेपरची विक्री करायची आहे. यासाठी दरपत्रक मागविण्यात आले असून इच्छुक अर्जदारांनी दरपत्रक दिनांक 17 जानेवारी 2025 पर्यंत अटी व शर्तीच्या अधीन राहून सादर करावे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
संबंधितांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली, जुना बुधगाव रस्ता, समाजकल्याण कार्यालयाजवळ, सांगली -416416 या पत्त्यावर दरपत्रक सादर करावे. अटी व शर्ती तसेच अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली कार्यालयाशी संपर्क साधावा.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰