yuva MAharashtra लघु उद्योजकांच्या जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास 20 जानेवारी अंतिम मुदत - महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी

लघु उद्योजकांच्या जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास 20 जानेवारी अंतिम मुदत - महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी




(सुधारीत)

लघु उद्योजकांच्या जिल्हा पुरस्कारासाठी

अर्ज करण्यास 20 जानेवारी अंतिम मुदत

- महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी

  सांगली, दि. 7, (जिमाका.) : सांगली जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रामधील असामान्य कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांकरिता राज्य शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतात. जिल्ह्यातील पात्र लघु उद्योजकांना तसेच ज्या उद्योजकांनी यापूर्वी अर्ज केले आहेत परंतु त्यांची निवड झाली नाही, अशा उद्योजकांना या पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 20 जानेवारी 2025 आहे, असे जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

            जिल्हा पुरस्कारासाठी प्रथम क्रमांकास 15 हजार रूपये, द्वितीय पुरस्कार 10 हजार रूपये, शालश्रीफळप्रमाणपत्र तसेच मानचिन्ह देण्यात येते. जिल्हा पुरस्कारासाठी उद्योग आधार हा स्थायी लघु उद्योग म्हणून उद्योग संचालनालय यांच्याकडे मागील तीन वर्षापूर्वी नोंदणीकृत असावातसेच मागील तीन वर्षे सलग उत्पादन प्रक्रियेत असलेला असावालघु उद्योग हा कोणत्याही संस्थेचा अथवा बँकेचा थकबाकीदार नसावा. तसेच यापूर्वी राज्य अथवा केंद्र शासनाचा कोणाताही पुरस्कार प्राप्त नसावापुरस्कारासाठी लघु उद्योगाची निवड करताना त्याने केलेली भांडवली गुंतवणू, आधुनिक तंत्रज्ञानसुव्यवस्थापनघटनेचे ठिकाणसामाजिक कार्यकर्मचारी सोयी सवलतीआयात-निर्यात क्षमतास्वावलंबन तसेच उद्योजक हा नवीन पिढीतील नवउद्योजक असावाउत्पादित वस्तु बाबतची गुणवत्ता इत्यादी विचार करण्यात येतो.

            पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्रसांगली यांच्याकडे विनामूल्य उपलब्ध आहेत. अर्ज करण्यारिता तसेच पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापकजिल्हा उद्योग केंद्रद्योग भवनसांगली यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

     




🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰