yuva MAharashtra बांधकाम कामगार सुविधा केंद्राच्या नावाखाली मंडळाची लूट व कामगाराची पिळवणूक तात्काळ बंद करा.... संजय कांबळे

बांधकाम कामगार सुविधा केंद्राच्या नावाखाली मंडळाची लूट व कामगाराची पिळवणूक तात्काळ बंद करा.... संजय कांबळे


वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन.




सांगली : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने संपूर्ण महाराष्ट्रभर 'बांधकाम कामगार सुविधा केंद्र' या नावाने मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कोट्यावधी रुपयांची लूट सुरू केली आहे. सदर लूट ताबडतोब थांबवून बांधकाम कामगारांना त्यांच्या कामाच्या वेळ नुसार त्यांच्या सोयीच्या नजिकच्या ठिकाणी, नोंदणी, नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजना लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देवून बांधकाम कामगारांची आर्थिक, मानसिक व शारीरिक पिळवणूक थांबवावी.वास्तविक मंडळाने 
बांधकाम कामगारांच्या हिताच्या दृष्टीने व कमीत कमी त्रासात विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देणे आवश्यक आहे परंतु केवळ ठेकेदाराचे हित बघून मंडळाचे विनाकारण आर्थिक नुकसान करणे हे जणू मंडळाचे काम झाले आहे की काय अशी शंका येत आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन झाल्यापासून आजतागायत कधीही तालुका निहाय सुविधा केंद्राची गरज भासली नाही, मग आताच का? मंडळाच्या कार्यकारिणीत कामगार प्रतिनिधी तसेच मालक प्रतिनिधी नसताना, मंडळाच्या अध्यक्ष आणि सचिव यांनी आपल्या मनमानी कारभार पध्दतीने केवळ आर्थिक तडजोड करण्यासाठी, खाजगी कंपन्यांना पोसण्यासाठी विनाकारण मंडळाच्या तिजोरीतून कोट्यावधी रुपये बांधकाम सुविधा केंद्रासाठी खर्च करणे योग्य आहे का? कारण हा पांढरा हत्ती पोसून बांधकाम कामगारांना लाभाच्या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी केंद्राबाहेर पहाटे तीन वाजल्यापासून नंबर लावावे लागत आहेत दोन-तीन दिवस नंबर येत नाहीत कामाचे खाडे करून दोन-तीन दिवस नंबरात थांबून ही जर नंतर बोलवलं जात असेल व त्यांचे अर्ज ही भरले जात नसतील तर हे केंद्र काय कामाचे. यापेक्षा सदरचे कोट्यावधी रुपये सुविधा केंद्राला घालवण्याऐवजी शासनाचे नागरी सुविधा केंद्र सीएससी सेंटर व नोंदणीकृत बांधकाम संघटनाचे कार्यालय यांना नोंदणी करण्याची परवानगी दिल्यास मंडळाचे कोट्यावधी रुपयांचा वाया जाणारा खर्च वाचेल व मंडळाला आर्थिक नुकसान ही होणार नाही. सांगली जिल्ह्यात पाहाता, तालुका निहाय जवळपास १४ सुविधा केंद्र सुरू केले आहे. एका सुविधा केंद्राला महिन्याच्या खर्च २ लाख रुपये आहे. तरी १४ सुविधा केंद्रासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातून २८ लाख रुपये प्रत्येक महिन्याला दिला जात आहे. तसे पाहता संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील तालुका निहाय सुविधा केंद्रासाठी कोट्यवधी रुपये हे बांधकाम कामगारांच्या हक्कांसाठी मंडळाकडे जमा होत असलेल्या १% सेस मधून केला जात आहे. हा उघडपणे वाईट भ्रष्टाचार केला जात आहे. बांधकाम कामगारांच्या हितासाठी असणारा निधी अशा गैर मार्गाने लाटला जात आहे. हि होत असलेली लूट ताबडतोब बंद करून,शासनाचे नागरी सुविधा केंद्र सीएससी सेंटर व नोंदणीकृत बांधकाम संघटनाचे कार्यालयात बांधकाम कामगारांचे  ताबडतोब काम होईल ते ही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांचे एक पैसा न खर्च करता. तरी मंडळाने बांधकाम सुविधा केंद्र तात्काळ बंद करून कामगारांना होणारा नाहक त्रास बंद करावा. व त्याच पैशातून बांधकाम कामगारांना लाभ द्यावा. अन्यथा संविधानिक मार्गाने दिवस आंदोलन छेडली जाईल व होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार असेल असे निवेदन वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्यावतीने सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर साहेब यांना देण्यात आले 


यावेळी जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे सर, संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, कार्याध्यक्ष जगदीश कांबळे, जिल्हा संघटक सिद्धार्थ कोलप, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव, मनपा अध्यक्ष युवराज कांबळे, सांगली शहर अध्यक्ष संगाप्पा शिंदे, मिरज शहर अध्यक्ष इसाक सुतार, कुपवाड शहर अध्यक्ष बंदेनवाज राजरतन, संजय चव्हाण, चांगदेव कांबळे, निलेश मस्कर, साकिब पटेल, सुनील चौगुले, आशरफ मुल्ला, मधुकर कोलप, संदिप कांबळे, अशोक दबडे, मोहसीन जमादार, कय्युम मुजावर, सचिन मोहिते यांच्या बरोबर बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰