yuva MAharashtra पद्मभूषण वसंतरावदादा पाटील विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा...

पद्मभूषण वसंतरावदादा पाटील विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा...




वार्ताहर : सचिन टकले

भिलवडी दि. १२ : पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथील भारती विद्यापीठाचे, पद्मभूषण वसंतरावदादा पाटील विद्यालयात शनिवारी ११ जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथील प्राचार्य मा.डॉ.संजय पोरे हे उपस्थित होते.




तसेच या क्रार्यक्रमासाठी खंडोबाचीवाडी चे माजी उपसरपंच उत्तम जाधव , मुख्याध्यापक महिंद बी.बी. वसगडे केंद्राचे केंद्रप्रमुख यांच्यासह किशोर भंडारे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी , ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक महिंद बी.बी.हे होते.

सर्वप्रथम प्रमुख पाहुणे व मान्यवर यांच्या शुभहस्ते संस्थेचे संस्थापक वंदनीय डॉ.पतंगराव कदम साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने समारंभास सुरुवात झाली. तसेच विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागतगीताने मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.

यानंतर विद्यार्थांनी वर्षभरात केलेले कार्यानुभव व कला या विषयांतर्गत विविध कलादालनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलना मध्ये  विविध गुणदर्शन अंतर्गत वैयक्तीक व समूह नृत्ये,नाटिका सादर केल्या.पालकांनी मोठ्या संख्येने सदर समारंभास मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.

विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या बौद्धिक,सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय यशाबद्दल प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन त्यांना गौरविण्यात आले.


प्रमुख पाहुणे मा.डॉ.संजय पोरे यांनी विद्यार्थ्यांचा गौरव करताना विशेष आनंद होत असल्याचे सांगितले व भावी काळातील उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या
तसेच विद्यालय राबवित असलेल्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले.


या समारंभाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख  श्री.धुमाळ ए.के. यांनी केले.
 सूत्रसंचलन श्री.मुल्ला एफ.ए. यांनी केले.तर आभार श्री.भोसले एस.बी. यांनी मानले.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰