पलूस दि. 8 : धकाधकीच्या जीवनात गतिमान झालेल्या रस्त्यांवरील मानवी चुकांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण बघता वाहतुकीचे नियम व सुरक्षित वाहतूक याविषयी जनजागृती करण्याच्या सामाजिक जाणिवेतून मंगळवार दि. 7 जानेवारी रोजी " रस्ता सुरक्षा अभियान 2025 चे अनुषंगाने " महामार्ग पोलीस केंद्र कवठे महांकाळ जि. सांगली यांच्या वतीने NH 266 वरील विजापूर ते गुहागर जाणार्या रोडवरील पलूस शहरात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले.
सहा. पोलीस निरीक्षक श्री.श्रीकृष्ण नावले यांचे मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस केंद्र कवठे महांकाळ कडील पोलीस अंमलदार पोलीस हवालदार प्रदीप पाटील , सुहास स्वामी , पोलीस नाईक विश्वास वाघमोडे , पोलीस कॉन्स्टेबल हर्षवर्धन पाटील व तौफिक चाऊस यांनी टू व्हीलर, फोर व्हीलर वाहतूक चालक मालक व नागरीक यांना वाहतूक नियमाबाबत माहिती देऊन हेल्मेटचा वापर, सीट बेल्टचा वापर, सिग्नलचे पालन आदी बाबींवर प्रबोधन केले.
वेग आवरा... जीवनाला सावरा ||
जो चुकला वाहतुक नियमाला ||
तो मुकाला जीवनाला ||
यासारखे महत्त्वाचे संदेश देत वाहतूक पोलीसांनी नागरिकांची जनजागृती केली.
या मोहिमेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला असून, शहरातील अनेक ठिकाणी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰