सांगली दि. ०३: क्रांतिज्योती सावित्रीमाईं फुले यांनी आपले जीवन संपूर्णपणे शिक्षणाद्वारे महिला आणि अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त एन.एस सोटी लॉ कॉलेज तर्फे अभिवादन करण्यात आले. सावित्रीमाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका मानल्या जातात. सावित्रीबाई केवळ समाजसुधारकच नव्हत्या, तर त्या तत्त्वज्ञ आणि कवयित्रीही होत्या. त्यांच्या कवितांमध्ये प्रामुख्याने निसर्ग, शिक्षण आणि जातीव्यवस्था नष्ट करण्यावर भर देण्यात आला होता. देशात जातिव्यवस्था शिगेला पोहोचली असताना त्यांनी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. स्वातंत्र्यापूर्वी भारतात महिलांवर फार भेदभाव केला जात होता. समाजात स्त्री वर्गाची स्थिती चांगली नव्हती. ती स्त्री अस्पृश्य समाजातील असेल तर हा भेदभाव आणखी मोठा होता. सावित्रीबाई फुले यांनी जोतिबा फुले यांच्या सोबत मिळून १८४८ मध्ये पुण्यात मुलींची शाळा सुरू केली. ही देशातील पहिली मुलींची शाळा मानली जाते. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले या दाम्पत्याने देशात एकूण १८ शाळा उघडल्या. मुलांना शिक्षण आणि शाळा सोडण्या पासून रोखण्यासाठी त्यांनी अनोखा प्रयत्न केला. मुलांना शाळेत जाण्यासाठी त्यांना विद्यावेतन देत असे. अस्पृश्य समाजातील लोकांना आपल्या घराची विहीरही खुली केली. त्यावेळी ही मोठी क्रांती होती.
यावेळी प्राचार्य डॉ. अमित सवदी यांच्या हस्ते सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ.अतुल कुरणे, प्रा. मनीष देशपांडे, प्रा. अल्हाद मांजरेकर, कॉलेज कर्मचारी विजय ठाकरे, स्वप्नील हुलकिरे, विजय देसाई, अमोल ढाणे यांच्यासह ॲड. अमोल वेटम, ॲड. महेश कांबळे, ॲड. कैलास पवार, ॲड. अस्मिता शहा, ॲड. सूरज होवाळे, ॲड. चैतन्य चवदार, ॲड. प्रज्वल राजमाने आदीसह विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰