सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 11 जानेवारी रोजी इस्लामपूर येथे विधी साक्षरता व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळाव्याचा लाभ घ्यावा, असे संयुक्त आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष प्रदीप शर्मा यांनी केले आहे. हा महामेळावा दि. 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता श्री सर्जेराव यादव मल्टीपर्पज हॉल, इस्लामपूर येथे होणार आहे.
या महामेळाव्याचे उद्घाटन उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तथा जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती श्रीमती भारती डांगरे व अभय आहुजा यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष प्रदीप शर्मा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. तर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या महामेळाव्यात विविध शासकीय कार्यालयांचे एकूण 30 स्टॉल मांडण्यात येणार आहेत. शासकीय कार्यालयाचे अधिकारी/प्रतिनिधी प्रत्येक स्टॉलवर त्यांच्या विभागांतर्गत योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच या महामेळाव्यात विविध शासकीय योजनांचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. तसेच, प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थींना योजनांचा लाभ मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. तरी महामेळाव्याचा विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना घ्यावा, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हेही पहा ---
https://youtu.be/o8dbAIk-vGg?si=8jpF0VJRsAJgGfHE
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰