yuva MAharashtra पलूस येथे स्वामी विवेकानंद जयंती विविध उपक्रमांनी संपन्न.... स्वामी विवेकानंद वाचनालयाच्या वतीने रक्तदान शिबीर..

पलूस येथे स्वामी विवेकानंद जयंती विविध उपक्रमांनी संपन्न.... स्वामी विवेकानंद वाचनालयाच्या वतीने रक्तदान शिबीर..




पलूस : स्वामी  विवेकानंद  वाचनालय पलूस येथे स्वामी  विवेकानंद जयंती (युवक  दिन )व राजमाता  जिजाऊ  यांची जयंती  विविध उपक्रमांनी  साजरी  करण्यात  आली.प्रतिमा पूजन व  रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी उद्योजक  बी. आर पाटील, वाचनालयाचे अध्यक्ष सुहास पुदाले, पलूस बँकेचे संचालक नितीन खारकांडे, स्वामी विवेकानंद ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संजय गणेशकर, संजीव तोडकर भीमराव भोरे, चंद्रकांत कुलकर्णी, पांडुरंग पुदाले, अधिकराव मोरे, मोहनराव पुदाले, सतीश पवार,सूर्यकांत माने, धनाजी सूर्यवंशी, मुकेश मुळे, सुनील पुदाले , वाचनालयाचे ग्रंथपाल सौ उमा पुदाले, वर्षा पुदाले,सोपान डोंगरे,संदीप मोरे, सचिन शिंदे ,  यांच्यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते



 
यावेळी उद्योजक बी आर पाटील म्हणाले ,
स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीनुसारच हे  मंडळ चालत आहे.सर्वानी वाचन वाढविणेची  गरज आहे स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाने भारतालाही जगात एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. त्यांनी रामकृष्ण मिशन सुरु केले.

  पांडुरंग पुदाले म्हणाले समाजात विवेकानंद व राजमाता जिजाऊंचे संस्कार रुजवन्याची  गरज आहे. मोबाईल, टीव्ही यापासून दूर राहून वाचन वाढविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

    संजय गणेशकर म्हणाले, गेली तीस वर्षे अविरतपणे स्वामी विवेकानंद मंडळ रक्तदान शिबिराचा जो उपक्रम  राबवित आहे हे फारच  कौतुकास्पद  आहे. शिव भावे जीव सेवा हे व्रत घेऊन गेली अनेक वर्ष अखंडीतपणे रक्तदान शिबिराचे व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. पल्या सर्वांच्या अनमोल अशा रक्तदानाने अनेकांचे प्राण वाचू शकतात.


 हुतात्मा स्मारक पलूस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्वामी विवेकानंद वाचनालय येथे मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्वांनी रक्तदान उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आभार ग्रंथपाल सौ उमा पुदाले यांनी मांनले.



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰