yuva MAharashtra ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून ऐतिहासिक मागोवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘इमर्जन्सी’ चित्रपटातून ऐतिहासिक मागोवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



मुंबईदि. 16 : ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून आणिबाणीच्या काळातील ऐतिहासिक मागोवा घेण्यात आला असून या कालावधीतील घटनाक्रम अचूकपणे टिपण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन बीकेसीतील पीव्हीआर येथे करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या नायिका कंगना राणावतकौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाआमदार प्रवीण दरेकरआमदार प्रसाद लाडचित्रपटाची संपूर्ण टीम आणि प्रेक्षक उपस्थित होते.




मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, आणीबाणीच्या कालावधीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बाजूला ठेवण्यात आले. मात्र ही घटना देशाच्या प्रत्येक नागरिकांस माहिती होणे आवश्यक आहे. आणीबाणीच्या कालखंडात नागरिकांचे अधिकार काढून घेण्यात आले होते. लोकशाहीवरील या संकटाची माहिती देशातील नागरिकांना कळणे गरजेचे आहे, असेही प्रतिपादन श्री.फडणवीस यावेळी केले.

अभिनेत्री कंगना राणावत यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांची भूमिका अतिशय उत्तम रंगवली असल्याचेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰