yuva MAharashtra सरपंच संतोष देशमुख मर्डर प्रकरण ; मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडवर अखेर मोकोका

सरपंच संतोष देशमुख मर्डर प्रकरण ; मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडवर अखेर मोकोका




बीड दि. 14 | केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील

मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडवर अखेर मोकोका लावण्यात आला आहे. तसेच वाल्मिक कराडच्या

न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. 

त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.


वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आल्यानंतर आता CID कोर्टात अर्ज दाखल केला आहे. CID ला सरपंच संतोष देशमुख खुनाच्या गुन्ह्यासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची आहे. मात्र त्यासाठी वाल्मिक कराडला ताब्यात द्या अशी मागणी CID ने केली आहे. मात्र आता मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडला CID च्या ताब्यात देणार का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे
सध्या वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. मात्र सरपंच संतोष देशमुख हत्त्या प्रकरणातील आरोपी हे वाल्मिक कराडशी संबंधित आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा काही संबंध आहे का? याचा तपास CID ला करायचा आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व आरोपी आणि वाल्मिक कराड यांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडवर हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा तपास करायचा आहे, असं एसआयटीने न्यायालयात म्हटलं आहे. त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


     फरार आरोपी कृष्णा आंधळे

 आत्तापर्यंत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, विष्णू चाटे, प्रतीक घुले व सिद्धार्थ सोनवणे हे सध्या अटकेत आहेत.   राज्यात अद्यापही संतापाची लाट आहे. कारण देशमुख यांच्या हत्येला 1 महिना उलटून गेला आहे. तरी देखील या प्रकरणामधील कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰