yuva MAharashtra बांधकाम कामगार नोंदणी, नूतनीकरण, लाभासाठी जास्त शुल्क आकारल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन

बांधकाम कामगार नोंदणी, नूतनीकरण, लाभासाठी जास्त शुल्क आकारल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन



 

        सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : बांधकाम कामगार नोंदणीनूतनीकरण व लाभ अर्ज प्रक्रिया यासाठी विहित शुल्काखेरीज जास्तीचे शुल्क आकारण्यात येत असेल, अशा प्रकरणी वस्तुनिष्ठ माहितीसह सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय सांगली येथे तक्रार नोंदवावी. सदर तक्रारीबाबत योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात येईलअसे सहाय्यक कामगार आयुक्त मुजम्मिल मुजावर यांनी स्पष्ट केले आहे.

        महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबईमार्फत बांधकाम कामगारांच्या सुविधेकरिता जिल्हास्तरावर जिल्हा कामगार सुविधा केंद्र तसेच गाव व तालुक्याच्या ठिकाणावरून जिल्हा सुविधा केंद्रात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तालुका स्तरावर कामगार सुविधा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सांगली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यासाठी एक अशी एकूण 10 कामगार सुविधा केंद्रे कार्यरत आहेत.

        महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे लाभार्थी म्हणून नोंदणी करण्यासाठी 18 ते 60 वयोगटातील बांधकाम कामगार वयाचा पुरावारहिवासी पुरावामागील 12 महिन्यात किमान 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र इ. कागदपत्रांसह संबंधित तालुक्यातील कामगार सुविधा केंद्रांमध्ये जावून नोंदणी अर्ज करू शकतात. तालुका सुविधा केंद्रात कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर सदर अर्ज तालुका नोंदणी अधिकारी यांना प्राप्त होतो. छाननीअंती तालुका नोंदणी अधिकारी अर्ज मंजूर करतात. त्यानंतर सदर बांधकाम कामगाराची मंडळाकडे लाभार्थी म्हणून नोंदणी होते. लाभार्थी म्हणून नोंदणी / नूतनीकरण करण्यासाठी              एक रूपये शुल्क आहे.

        मंडळामार्फत नोंदीत लाभार्थींसाठी शैक्षणिक सहाय्य योजनाआरोग्य विषयक योजनाआर्थिक सहाय्य योजनासामाजिक सुरक्षा व अन्य अशा एकूण 32 प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या योजनांच्या लाभासाठी अर्ज करणे आवश्यक असून तालुका सुविधा केंद्रात कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर अर्ज तालुका नोंदणी अधिकारी यांना प्राप्त होतो. छाननीअंती तालुका नोंदणी अधिकारी अर्ज मंजूर करतात. मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी लाभ अर्ज प्रक्रिया दरम्यान कोणतेही शुल्क आकारले जात नाही, असे श्री. मुजावर यांनी कळविले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰