yuva MAharashtra आर्टीच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांचे आवाहन

आर्टीच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांचे आवाहन



 

मुंबईदि. ७ : मातंग समाजाच्या सामाजिकशैक्षणिकआर्थिकसांस्कृतिक  असा सर्वांगीण विकास करण्यासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेची नोंदणी पूर्ण झाली असूनमातंग समाज आणि त्यातील तत्सम जातींच्या उन्नतीकरिता विविध कौशल्य प्रशिक्षणस्पर्धा पूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी मातंग समाजातील उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षाकौशल्य प्रशिक्षणाचे गुगल फॉर्म भरण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी केले आहे.

उमेदवारांनी गुगल फॉर्म भरल्यानंतर त्यांनी निवडलेल्या कौशल्य प्रशिक्षणानुसार त्यांच्या अर्जाची छाननी करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. जे उमेदवार स्वयंरोजगार करण्यासाठी इच्छुक आहेतत्यांना व्यवसायाकरिता आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन गुगल फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. असे व्यवस्थापकीय संचालक श्री. वारे यांनी सांगितले.

असे आहेत प्रशिक्षण कोर्सेस

स्पर्धा परीक्षा : एमपीएससीयुपीएससीबॅंक (आयबीपीएस)रेल्वेजेईई- नीटयुजीसी- नेट/सेटपोलीस/ मिलीटरी,

कौशल्य विकास : परदेशात नोकरी व शिक्षणाची संधीशेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षणहार्डवेअर व सॉफ्टवेअरतसेच कम्प्युटर सर्टिफिकेट संदर्भतील कोर्सेस.

योजना : पीएच. डीपोस्ट पीएच.डी संशोधनासाठी अभिछात्रवृत्ती (फेलोशिप)

असा अर्ज करावा :

• इच्छुक उमेदवारांनी https://arti.org.in या आर्टीच्या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डवर गुगल लिंक व स्कॅनर देण्यात आले आहे.

• उमेदवारांना गुगल लिंक किंवा स्कॅन करुन संपुर्ण फार्म भरता येईल.




🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰