yuva MAharashtra बालमहोत्सवातून मुला - मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे

बालमहोत्सवातून मुला - मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे


तीनदिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव दिमाखात सुरू


 

सांगली, दि. 6, (जिमाका.) : चाचा नेहरू बालमहोत्सवात बालकांनी सादर केलेल्या कार्यक्रमातून आपणाला र्जा मिळाली. या बालमहोत्सवाचा मुलांनीही आनंद घ्यावा. जीवनात कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही प्रसंगात चेहऱ्यावरील हास्य कायम ठेवावे व आनंदाने जगावे. या महोत्सवामुळे मुला - मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळेलतसेचत्यांच्यामध्ये जीवनातील संघर्षाला सामोरे जाण्याची शक्ती निर्माण होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज येथे केले.



जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीसांगली यांचेमार्फत शासकीय / स्वयंसेवी संस्था व शाळांमधील बालकांसाठी आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव सन २०२४-२५ च्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्यायावेळी पोलिस उपअधीक्षक दादासाहेब चुडाप्पाजिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटीलजिल्हा परिषद जिल्हा कार्यक्रम अधिकारी संदीप यादवनागरी विकास प्रकल्प अधिकारी सुहास बुधावले, दादुकाका भिडे बालगृह संचालिका भारती दिगडे, डॉ. जयश्री पाटील, मानद कार्यवाहक सुनिल कोरे आदि उपस्थित होते.



समाजाचे एक घटक म्हणून विशेष बालकांची सामान्य बालकांप्रमाणेच विशेष काळजी घेऊन त्यांना प्रेम देत असल्याबद्दल संबंधितांचे कौतुक करून मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, समाजामध्ये दुर्देवी घटनांमुळे एकाकी पडलेल्या बालकांना संघर्ष करावा लागतो. मात्र जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय तसेच स्वयंसेवी संस्थांकडून अशा बालकांना आधार दिला जातो हे वाखाणण्याजोगे आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीस्वावलंबी बनविण्यासाठी आपण प्रयत्न करत आहातअसे त्या म्हणाल्या.

जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना संचलित कै. दादू काका भिडे मुलांचे निरिक्षण/बालगृह व सौ. सुंदरबाई मालु मुलींचे निरीक्षण गृह/बालगृहसांगली या ठिकाणी हा बालमहोत्सव ०८ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहेजिल्ह्यातील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय/ स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथनिराधार मुलांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभावसांघिक भावना निर्माण करण्यासाठी बाल मेळावाक्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम अशा तीन दिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.



यावेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष व बाल न्याय मंडळाचे सदस्य, संस्था अधीक्षक, कर्मचारी, कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारीतालुका संरक्षण अधिकारीजिल्हा बाल संरक्षण कक्षजिल्हा चाईल्ड लाईन यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

प्रारंभी संस्थेतील बालिकांनी मान्यवरांचे औक्षण करून स्वागत केले. तसेच बालगृहातील बालकांनी संचलनाद्वारे मान्यवरांच्या उपस्थितीची शोभा वाढवलीगणित प्रदर्शन व वाचन क‌ट्ट्याच्या उद्घाटनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰