कॅम्पसला भेट देवून कामांना गती देण्याचे निर्देश
नागपूर, दि. 11 : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) याबाब विश्वासार्हता अधिक असून. येथील वैद्यकीय सेवा-सुविधा वाढाव्यात व अधिकाधिक गरजू रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे आराखड्यानुसार कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विकासकामांचा आढावा घेतला.
यावेळी आमदार सर्वश्री प्रवीण दटके, मोहन मते, आशीष देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण, डॉ. राज गजभिये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
देखरेखीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॅार रूम
मेयो आणि मेडिकलची प्रगतीपथावरील कामे, सद्यस्थिती, अडी-अडचणी, कामाची गुणवत्ता यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॅार रूम स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच येथील वीजेची गरज सौर ऊर्जेच्या माध्यमातून भागविली पाहिजे. संपूर्ण कॅम्पस सौर ऊर्जेवर असावा. सध्याची प्रस्तावित कामे पूर्ण केल्यानंतरच नवीन कामे सुरू करावीत. यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. अधिकाधिक झाडे लावण्यावर भर देण्यात यावा. उभारण्यात येणाऱ्या सर्व इमारतीमधील प्रसाधनगृहांची देखभाल योग्य प्रकारे व्हावी यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याच्या सूचना ही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी केल्या.
मेयो आणि मेडिकल येथे सुरू असलेल्या कामांचा एप्रिल महिन्यात पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी कामाच्या सद्यस्थितीची माहिती प्राधान्याने घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस सांगितले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰