yuva MAharashtra मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांचा सांगली जिल्हा दौरा

मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांचा सांगली जिल्हा दौरा



 

        सांगली, दि. 9, (जिमाका.) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे शुक्रवार, ‍दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            शुक्रवार, ‍दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सांगली येथे आगमन व मटण आणि फिश मार्केटच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थितीस्थळ - नळभागसांगली. दुपारी 12.30 वाजता हिंदू व्यवसाय बंधु प्रदर्शनाच्या उद्घाटनास उपस्थिती व प्रदर्शनातील स्टॉलला भेटीस्थळ - सिव्हील हॉस्पिटलमागे सांगली. दुपारी वाजता हिंदू एकता आंदोलन व हिंदू व्यवसाय बंधू आयोजित हिंदू गर्जना सभेस उपस्थितीस्थळ मराठा सांस्कृतिक सभागृहजिजाऊ रोडसिव्हील हॉस्पिटलमागेसांगली. दुपारी 2.30 वाजता सकल हिंदू समाज आयोजित पुष्पराज चौक ते सांगली गावभाग रॅलीस उपस्थिती व त्यानंतर शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीस उपस्थिती आणि उपस्थितांचे संबोधनस्थळ - छत्रपती शिवाजी महाराज स्मारक गावभागसांगली. दुपारी 3.05 वाजता सांगली येथून मोटारीने कवलापूरकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता कवलापूर विमानतळ येथे आगम आणि हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰