yuva MAharashtra येणाऱ्या तरुण पिढीने आपल्या डोळ्यावरची झापडं उघडली पाहिजेत..; आरोग्यासाठी सर्वोत्तम स्वयंपाक तेल कोणते आहे? कोणते खाद्य तेल वापरावे ?

येणाऱ्या तरुण पिढीने आपल्या डोळ्यावरची झापडं उघडली पाहिजेत..; आरोग्यासाठी सर्वोत्तम स्वयंपाक तेल कोणते आहे? कोणते खाद्य तेल वापरावे ?



येणाऱ्या तरुण पिढीने आपल्या डोळ्यावरची झापडं उघडली पाहिजेत..;

आरोग्यासाठी सर्वोत्तम स्वयंपाक तेल कोणते आहे? 

कोणते खाद्य तेल वापरावे ?

उत्तर - आपण ज्या हवामान व प्रदेशात राहतो तेथे जे पिकवले जाते ते आपल्या शरीराला पोषक ठरते.

उदाहरण:

उत्तरप्रदेश येथे    -    सरसो ऑइल
केरळ येथे          -     कोकोनट
कर्नाटक येथे      -     सूर्यफूल
महाराष्ट्र येथे       -     करडई,शेंगदाणा

शेंगदाणा तेल

पदार्थांची रुची वाढवते, चटणी, पिठले ,सॅलेड यांना वरतून वापरले तरी तेलातील जीवनसत्व मिळतात. व पचन सुधारते, तळण , फोडणीसाठी चालते, गुड कोलेस्ट्रोल वाढवते.
बॅड कोलेस्ट्रोल कमी करते. स्किन सॉफ्ट होते.
जीवनसत्त्वे - A, E, C, D

करडई तेल 

स्वयंपाक घरात फोडणीत, पदार्थ तळण्या करीता चांगले आहे. रक्तातील साखर नियंत्रणात राहते. उच्च रक्तदाब व हृदय रोग यावर नियंत्रण येते. चरबी कमी करण्यास उपयुक्त.

सूर्यफूल तेल

स्वयंपाक करण्यासाठी वापरतात. थोडा उग्र वास येतो. हाडांसाठी चांगले, संधीवात कमी करते, अस्थमा प्रतिबंध होतो, कर्करोगाला प्रतिबंध होतो. परंतु राजीवभाईंनी हे तेल योग्य नसल्याचे म्हटलं आहे.

जवस तेल

स्वयंपाक घरात पदार्थ करण्यासाठी वापरात नाही. हे तेल चटणीमध्ये किंवा कणिक भिजवताना किंवा चपातीला वरती लावून खावे. हे तेल चवीला उग्र असते. उष्ण व औषधी आहे. यामुळे हार्टब्लॉकेजेस रक्तातील गुठळ्या कमी होतात. स्त्रियांच्या रजोनिवृत्ती नंतर निर्माण होणाऱ्या इस्ट्रोजन संबंधित हार्मोन्सवर गुणकारी आहे. ओमेगा 3 मुळे पेशींची लवचिकता वाढते. या तेलात 6 जीवनसत्त्वे आहेत त्यामुळे, ऑस्टिओपोरासिस, ऑस्टिओआर्थयटीस, अस्थमा, कॅन्सर यामध्ये हे तेल गुणकारी आहे. या तेलाचा वापर योग्य प्रमाणात करावा.

खोबरेल तेल

खोबरेल तेलाचे अनेक उपयोग आहेत.
स्वयंपाकासाठी चांगले आहे.
विशेषतः या तेलात शिरा, पोहे, उपमा, साऊथ इंडियन पदार्थ खूपच चविष्ट होतात. तळण्यासाठी सुध्दा चांगले. *याचे वैशिष्ट हे की* 2 ते 3 वेळेस तळले तरी तेलातील व्हिटॅमिन टिकून राहतात. पोटाचा घेर कमी करून शरीर स्लिम करते. चरबी कमी करणारे आहे. अँटीसेफटिक म्हणून देखील उपयोगी आहे. यामध्ये कापूर, अमृधारा, नीम तेल प्रमाणात टाकल्यास केस काळे व दाट होऊन केसांच्या समस्या दूर होतात. सूर्याच्या कोवळ्या उन्हात वरील मिश्रण लावल्यास कोंडा जातो. शरीरात थंडावा ठेवते.

तीळ तेल

तीळ तेल हे शरीर संतुलित करते. स्नेहन करण्यासाठी चांगले.
वरतून खाण्यासाठी चांगले
स्वयंपाकासाठी चालते पण
तळण्यासाठी वापरू नाये. हे तेल मुळात लवकर खराब होत नाही.
हाडे मजबूत करते, रक्तदाब नियंत्रित करते, ब्रेनसाठी चांगले, यामध्ये ओमेगा 6, इ, क, ब6 हे जीवनसत्त्वे आहेत.

सरसो तेल 

हे तेल अतिशय उष्ण आहे.
सर्व प्रकारे स्वयंपाकासाठी वापरता. यामध्ये ओमेगा 3 असते , कोलेस्टेरॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, यांना प्रतिबंध होतो.
पचनशक्ती सुधारते, शौचाला साफ होते, प्रतिकार शक्ती वाढवते, 
या तेलाने मसाज केल्यास अंगदुःखी थांबते.

संकलन-

निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰