yuva MAharashtra कायद्याची जाण निर्माण करण्यासाठी, सामाजिक न्यायासाठी महाशिबिर उपयुक्त ठरेल - न्यायमूर्ती भारती डांगरे

कायद्याची जाण निर्माण करण्यासाठी, सामाजिक न्यायासाठी महाशिबिर उपयुक्त ठरेल - न्यायमूर्ती भारती डांगरे

इस्लामपूरमध्ये विधी साक्षरताशासकीय योजनांचे महाशिबिर उत्साहात संपन्न





 



            सांगलीदि. 11, (जिमाका.) : भारतीय संविधानाने आपणास अनेक हक्क दिले आहेतपरंतुअनेक जण त्यापासून अनभिज्ञ आहेतत्यांच्यामध्ये कायद्याची जाण निर्माण करण्यासाठी तसेचशासकीय योजनांच्या माध्यमातून सामाजिक न्याय देण्यासाठी हे महाशिबिर उपयुक्त ठरेलअसे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तथा जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी आज केले.

            इस्लामपूर येथे आयोजित विधी साक्षरता व शासकीय योजनांच्या महाशिबिरात त्या बोलत होत्याया महाशिबिराचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तथा जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती भारती डांगरे व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्याहस्ते झालेत्यावेळी त्या बोलत होत्या.

श्री सर्जेराव यादव मल्टीपर्पज हॉलइस्लामपूर येथे आयोजित या महाशिबिरास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधीप्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष प्रदीप शर्माजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व पोलीस अधीक्षक संदीप घुगेजिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 व इस्लामपूरचे अतिरीक्त सत्र न्यायाधीश अनिरूद्ध गांधीजिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव गिकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.



सामान्य माणसाने हे समजून घ्यावे कि कायदा म्हणजे त्याला दिलेला हक्कत्याला तो हक्क मिळवून देणे म्हणजे न्याय देणेअसे सांगून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तथा जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती भारती डांगरे म्हणाल्याकायदा म्हणजे काही नियम आहेतजे नियम समाजाने पाळणे अतिशय आवश्यक आहेजीवनातील छोट्या छोट्या गोष्टींसाठी कायद्यात तरतूद केली आहेमात्रसंविधानाने ज्याप्रमाणे अधिकार दिले आहेतत्याचप्रमाणे कर्तव्येही आखून दिली आहेतआपण भारताचे सुजाण नागरिक म्हणून या कर्तव्यांचे पालन करणे आवश्यक आहेजे या महाशिबिरास उपस्थित आहेतत्यांनी इतरांनाही हे हक्ककर्तव्ये व शासकीय योजनांची माहिती द्यावीअसे त्या म्हणाल्या.



पालक न्यायमूर्ती भारती डांगरे म्हणाल्याप्रत्येक जण न्यायालयात जातोच असे नाहीसमाजातील प्रत्येक व्यक्तीला न्यायाचा अधिकार आहेत्यापासून कोणीही वंचित राहू नयेयासाठी पुष्कळ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेतलोकन्यायालयग्रामन्यायालयाची स्थापना करण्यात आली आहेतसेचसामाजिक न्याय देण्यासाठीसमाजातील विषमता दूर करण्यासाठी अनेक शासकीय योजना कार्यान्वित आहेतविधी साक्षरता व शासकीय योजनांचे महाशिबिरातून यांची माहिती होईलतसेचलाभार्थींना लाभाचे वितरणही करण्यात येत आहेअसे त्या म्हणाल्या.

जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती भारती डांगरे म्हणाल्याकुटुंबातील महिला सक्षम होईलतेव्हा पूर्ण समाज सक्षम होईलसमाजातील अनेक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेतआज या महाशिबिरासाठी महिलांची लक्षणीय उपस्थिती आपणास समाधान देणारी आहेकारण त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव आहेअसे त्या म्हणाल्या.

विधी सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या या युनिक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अभय आहुजा म्हणालेन्याय मिळाल्याची भावना ही सुरक्षिततेची भावना आहेसर्वांना न्याय देण्यासाठीलोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी विधीमंडळन्यायपालिका व प्रशासन या लोकशाहीच्या तीन स्तंभांनी समन्वयाने काम केले पाहिजेसंविधानाच्या प्रस्ताविकेत न्याय हा शब्द लिहिला आहेत्यातील सामाजिकआर्थिक व राजनैतिक न्याय देण्यासाठी अशा महाशिबिरांचे आयोजन उपयुक्त ठरेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



जिल्हाधिकारी डॉराजा दयानिधी म्हणालेनागरिकांची कायदेविषयक साक्षरता वाढवण्यासाठी व शासकीय योजनांद्वारे मदत देण्यासाठी या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहेनागरिकांनी स्टॉलना भेटी देऊन विविध योजनांची माहिती व लाभ घ्यावाउत्पन्न मर्यादा तीन लाखांच्या आत असलेल्या गरजू नागरिकांना अटी शर्थीच्या आधारे नि:शुल्क कायदेविषयक सल्ला दिला जातोयाबाबत काही शंका असल्यास टोल फ्री क्रमांक 15100 वर संपर्क साधावात्यांना कायदेशीर सहाय्य दिले जाईलई पीक पाहणीचे ॲप डाऊनलोड करून खरीप व रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी पिकांची छायाचित्रे अपलोड करून पिकांची नोंदणी करावीतसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणे बंधनकारक आहेत्यामुळे नागरिकांनी ई केवायसी करून घ्यावीअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.



पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणालेकायदा प्रत्येकासाठी समान आहेनागरिकांना त्यांचे अधिकार व कर्तव्ये यांची जाणिव असणे आवश्यक आहेपोलीस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहेनवीन कायदेविषयक माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करत असून या महाशिबिराद्वारे कायदेविषयक साक्षरता होईल.  

प्रास्ताविकात शिबिराचा हेतू विषद करताना प्रदीप शर्मा म्हणालेनागरिकांना त्यांच्या हक्काचीकायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी हे महाशिबिर आयोजित करण्यात आले आहेशिबिरामध्ये विविध शासकीय योजनांचीकायद्याची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले आहेतत्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.

प्रारंभी राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणचे गीत गायन करण्यात आलेतसेचभारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बेटी बचाओबेटी पढाओ संदर्भात कायदेविषयक जनजागृती करणारे पथनाट्य सादर केलेमान्यवरांनी रोपट्यांना पाणी घालून वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केलेसूत्रसंचालन तदर्थ जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 इस्लामपूर अचला काशिकर यांनी केलेआभार जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 व इस्लामपूरचे अतिरीक्त सत्र न्यायाधीश अनिरूद्ध गांधी यांनी मानलेया महाशिबिरासाठी जिल्हा व तालुका न्यायालयातील न्यायाधीशन्यायालयाचे अधिकारीकर्मचारीवकील संघटनांचे पदाधिकारीलाभार्थीनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होतेराष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



विविध शासकीय कार्यालयांचे एकूण 30 स्टॉल मांडण्यात आले होतेप्रत्येक स्टॉलवर संबंधित विभागाचे अधिकारी/प्रतिनिधी त्यांच्या विभागांतर्गत योजनांची माहिती देण्यात आलीया स्टॉलना मान्यवरांनी भेट दिलीतसेच मान्यवरांच्या हस्ते 26 लाभार्थींना विविध शासकीय योजनांचा प्रातिनिधीक स्वरूपात लाभ देण्यात आला.





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐  https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰