राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पलूस तालुका अध्यक्षांचा राजीनामा
पलूस, ता. १५/०१/२०२५
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पलूस तालुका अध्यक्ष मोहन पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा अध्यक्ष देवराज पाटील यांच्याकडे दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे आपण हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा अध्यक्षांकडून सदर राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात शरद पवार गटाची ताकद चांगली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. अरुण लाड, माजी आ. मानसिंगराव नाईक, माजी. आ. शिवाजीराव नाईक यांच्यासह आ. रोहित पाटील,प्रतीक पाटील शरद लाड असे संघटनात्मक ताकद असणाऱ्या युवा नेतेमंडळींची फौज आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघात सुद्धा राष्ट्रवादीचे मोठे संघटन आहे. आ. अरुण लाड व क्रांतिअग्रणीचे अध्यक्ष शरद लाड यांनी गावोगावी पक्षाची संघटना उभी केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकरणीची नव्याने बांधणी व्हावी, अशी मागणी पलूस तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली होती. जुन्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन पदाधिकारी नेमण्यात येणे अपेक्षित असल्याने त्यापद्धतीने आपण तयारीत आहोत. लवकरच पलूस तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील पक्षाच्या नूतन कार्यकारणीची घोषणा करण्यात येईल. तसेच सक्षम पदाधिकारी नेमणूक करून येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या जोमाने लढवल्या जातील, असे विधान जिल्हा अध्यक्ष देवराज पाटील यांनी केले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰