yuva MAharashtra पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 17 फेब्रुवारीला

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 17 फेब्रुवारीला



 

        सांगलीदि. 6 (जि. मा. का.) : जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रसांगली व लठ्ठे पॉलिटेक्निक सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा" सोमवारदिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता ठ्ठे पॉलिटेक्निकएमआयडीसीकुपवाडसांगली येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम  यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

            

      या मेळाव्यात 500 पेक्षा अधिक पदाकरिता जिल्ह्यातील नामांकित अशा 12 पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग असणार आहे. दहावीबारावीआय. टी. आय.डिप्लोमाग्रॅज्युएटपोस्ट ग्रॅज्युएट या प्रकारची शैक्षणिक पात्रता असणाऱ्या आणि सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी विविध पदांकरिताविविध उद्योजकांकडे प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटद्वारे आपला ऑनलाईन सहभाग नोंदवावा.


सोमवारदिनांक 17 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मुलाखतीस येताना उमेदवारांनी त्यांची सर्व मूळ कागदपत्रेपासपोर्ट साईज फोटो आणि बायोडाटाच्या किमान तीन प्रती सोबत घेऊन याव्यात. रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीसाठीजिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमध्यवर्ती प्रशासकीय इमारततळमजलाविजयनगरसांगली या कार्यालयाशी 0233-2990383 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰