yuva MAharashtra माजी सैनिकांनी 31 मार्चपर्यंत नोंदणी करावी

माजी सैनिकांनी 31 मार्चपर्यंत नोंदणी करावी



 

        सांगलीदि. 6 (जि. मा. का.) : केंद्रीय सैनिक बोर्ड व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडील सेवांच्या लाभासाठी माजी सैनिकांनी केएसबी (KSB) व महा सैनिक  (Maha Sainik) साईटवर दि. 31 मार्च 2025 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

            केंद्रीय सैनिक बोर्ड (KSB) व जिल्हा सैनिक कल्याण  कार्यालय (ZSWO) या कार्यालयांकडून कोणत्याही सेवांचा लाभ घेण्यासाठी निवृत्त अधिकारी व माजी सैनिक / माजी सैनिक विधवा /अवलंबितांना केएसबी आणि महा सैनिक यांच्या साईटवर नोंदणी करावी लागेलअसे विभागीय सैनिक बोर्ड पुणे यांच्याकडून सूचित करण्यात आले असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰