yuva MAharashtra कौटुंबिक न्यायालय सांगलीचा 5 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

कौटुंबिक न्यायालय सांगलीचा 5 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा



            सांगली, दि. 14, (जि. मा. का.) कौटुंबिक न्यायालयसांगलीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त कौटुंबिक न्यायालयसांगली  येथे नांदा सौख्यभरे आयोजित करण्यात आला. कौटुंबिक न्यायालय सांगलीचा 5 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.

            यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या माध्यमातून पुन्हा मनोमिलन होवून नांदवयास गेलेल्या जोडप्यांचा कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश सुनिता तिवारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.  यावेळी न्यायालयात पक्षकारांसोबत लेल्या त्यांच्या बालकांना सोबत घेऊन दिप प्रज्वलन व रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरूवात झाली.




            अध्यक्ष स्थानावरून बोलताना न्यायाधीश सुनिता तिवारी यांनी कौटुंबिक वादाचे वैकल्पिक निवारण आणि जोडीला मुलांच्या हक्कांचे संगोपणसंस्कार जोपासण्याचे प्रतिपादन केले. यावेळी फुगे व फुलांनी न्यायालयाची सजावट करण्यात आली होती.  सन्मान करण्यात आलेल्या पक्षकारांच्या मुलांच्या सोबतीने केक कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आलीश्री सुहास धोतरे यांनी गीत सादर केले.

            प्रस्तावना व संकल्पना कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक ज्योती बावले भालकर यांनी केली.  यावेळी जेष्ठ विधीज्ञ किरण पाटीलशकील पखालीजयंत नवलेगणेश भोतेजस सन्मुखशितल सावंतपोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र वायदंडे यांनी मनोगत व्यक्त केलेसुत्रसंचालन संजय लोणकर यांनी केले. आभार सहाय्यक अधिक्षक शैलजा वेदपाठक यांनी मानले.

            कार्यक्रमास न्यायालयाचे प्रबंधक एस.व्हीदांडेकरविकास राऊतमहेश खटावकरश्रृती दुधगांवकरसुनिता चौगुलेप्रतिभा महाडीकशरद चांदवलेसुहास धोतरेतृप्ती फासे व अंगरक्षक अश्विन सोनेकरमहिला पोलिस नगिना पाटील तसेच विधीज्ञ व पक्षकार उपस्थित होते.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰