yuva MAharashtra वाळवेकर हॉस्पिटल सांगली डॉ. सुधाकर जाधव सांगली हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भिलवडी येथे मोफत आरोग्य शिबीर सपन्न झाले

वाळवेकर हॉस्पिटल सांगली डॉ. सुधाकर जाधव सांगली हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भिलवडी येथे मोफत आरोग्य शिबीर सपन्न झाले

वाळवेकर हॉस्पिटलच्या मार्फत 78 तर जाधव हॉस्पिटल च्या मार्फत 32 पेशन्ट नी लाभ घेतला 


भिलवडी प्रतिनिधी दि 14  : वाळवेकर हॉस्पिटल सांगली व डॉ. सुधाकर जाधव हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर संपन्न झाले यामध्ये वाळवेकर हॉस्पिटलच्या मार्फत 78 रुग्णांची तपासणी करण्यात आली तर सुधाकर जाधव हॉस्पिटलच्या मार्फत 32 रुग्णांची तपासणी करण्यात आली भिलवडी परिसरातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.


     यावेळी डॉक्टर वाळवेकर म्हणाले गरजूंना या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ व्हावा यासाठी हे शिबिर राबविण्यात आले आहे नागरिकांना स्वतः ला कोणता आजार होऊ नये यासाठी प्रत्येकाने कमीत कमी एक तास व्यायाम करावा आपल्या शरीराची काळजी आपण घेतली तर बाकीचे आजार होणार नाहीत या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी यांनी मोलाचे सहकार्य केले  आशा भावना डॉ वाळवेकर यांनी व्यक्त केल्या 
            पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व
आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पिवळे, केशरी, शिधापत्रकधारक, अत्योंदय आणि अन्नपूर्णा धारक यांना योजनेचा लाभ घेता येईल .योजने अंतर्गत होणारे मोफत उपचार डॉ. वाळवेकर हास्पिटल मार्फत -युरोलॉजी विभाग (मोफत उपचार), किडणीतील खडे मशिनद्वारे फोडण्याची सोय.किडणीतील मोठे खडे दुर्बिणीद्वारे काढण्याची सोय. प्रोस्टेट ग्रंथीची मोफत शस्त्रक्रिया. तर डॉ. सुधाकर जाधव हास्पिटल मार्फत लहान मुलांच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातील.
    यावेळी डॉक्टर सोनल होवाळ व प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰