yuva MAharashtra पलूस येथील हजरत दावल मलिक बाबांचा उरूस २७ रोजी

पलूस येथील हजरत दावल मलिक बाबांचा उरूस २७ रोजी




पलूस प्रतिनिधी :

सांगली  : पलूस येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत दावल मलीक बाबा यांचा ऊरूस गुरूवार दि. २७ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. ६०३ वर्षाची परंपरा असलेल्या व नवसाला पावण्याची ख्याती असलेल्या दावल मलिक बाबा यांचा ऊरूस मोठया उत्साहाने साजरा केला जातो. बुधवार २६ फेब्रुवारी रोजी रात्री गलीफ व संदल (गंध) देवाला अर्पण करण्याचा कार्यक्रम होणार आहे. गुरूवारी ऊरूसाचा मुख्य दिवस आहे. 


राज्यभरातून तसेच परराज्यातून सुद्धा भाविकांचा मोठा ओढा दर्गाहला येण्याकडे असतो. या दिवशी खेडोपाडयातून व गावातून येणा-या भाविकांना प्रसाद करून वाटला जाणार आहे. याचा सर्व भाविकांनी लाभघ्यावा असे आवाहन दर्गाह मुजावर ( खिदमतगार)हसलम युसूफ मुल्ला, अजमुद्दीन युसूफ मुल्ला, नसीर युसूफ मुल्ला यांनी केले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰