yuva MAharashtra उशिरा नोंदीचे जन्म मृत्यू प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया तात्काळ सुरु करा.. अन्यथा जनआंदोलन

उशिरा नोंदीचे जन्म मृत्यू प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया तात्काळ सुरु करा.. अन्यथा जनआंदोलन






पलूस दि. १७ : मृत्यू झालेल्या इसमांच्या वारसांना व जन्म नोंद नसणाऱ्या इसमांना उशिरा जन्म मृत्यू नोंदणी करून मिळावी या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा यांनी पलूसचे तहसीलदार यांना सोमवारी निवेदन दिले.


जन्म मृत्यू नोंदणी कायदा 1969 नुसार उशिरा जन्म मृत्यू नोंदणी संदर्भात ज्यांच्या जन्माची अथवा मृत्यूची नोंद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत नगरपालिका दप्तरी नोंदवलेले नव्हते अशा मृत्यू झालेल्या इसमांच्या वारसांना व जन्म नोंद नसणाऱ्या इसमांना दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ तर यांचे समोर अर्ज करून जन्माची अथवा मृत्यूची नोंद घालणे संदर्भातील आदेश प्राप्त करावा लागत होता. ही न्यायालयीन प्रक्रिया थांबून ते अधिकार उपविभागीय अधिकारी यांना दिले होते. हे अधिकार दिनांक 21 /01 / 2025 च्या शासन परिपत्रकानुसार स्थगित केले असून उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्याची कारवाई पुढील आदेशापर्यंत तहकूब ठेवण्यात आलेली आहे.

  त्यामुळे उशिरा जन्म व मृत्यू नोंदी कामे नोंदवणे बंद झाले असून त्याचा फटका विद्यार्थी , सर्वसामान्य शेतकरी , नोकरवर्ग , महसुली खात्यातील नोंदी व शालेय कामकाजात अडचणी निर्माण होऊन बऱ्याच लोकांना व विद्यार्थ्यांना बसत आहे. अनेक लोकांच्या शालेय विद्यार्थ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झालेली आहे. याची गंभीर दखल घेऊन उशिरा जन्म मृत्यू प्रमाणपत्र आपल्या अधिकारात आपण देण्याची कृती करावी अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला शालेय विद्यार्थी शेतकरी यांना सोबत घेऊन जन आंदोलन उभा करावे लागेल त्या आंदोलनामुळे काही विपरीत सामाजिक परिस्थिती निर्माण झालेस त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी अशा आशेयाचे लेखी निवेदन पलूस चे तहसीलदार दीप्ती रिठे यांना दिले आहे. अशी माहिती संदीप राजोबा यानी दिली आहे.


यावेळी पलूस तालुका अध्यक्ष बाळासो शिंदे , धन्यकुमार पाटील , मनोहर पाटील , वैभव सावळवाडे , रोहित पाटील , संदीप पाटील व संतोष राजोबा उपस्थित होते.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰