कोल्हापूर प्रतिनिधी दि. १५ : समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था,न्यूट्रीस्टार हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड व समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या व्यसनमुक्त व रोगमुक्त भारत अभियानांतर्गत गोवा येथे दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी न्यूट्रीस्टार हेल्थ प्रो.प्रा.लिमिटेड चेअरमन प्रदीप कुंभार यांनी व्यसन आणि मधुमेहा बरोबर जगामध्ये प्रतिवर्षी वेगवेगळ्या नवीन आजारांची संख्या वाढत असून शारिरीक प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे असल्याचे म्हटले. यासाठी संस्थेने संशोधन करून अनेक आजारांवर खात्रीशीर उपयोगी पडणाऱ्या नवीन आयुर्वेदिक उत्पादनाची निर्मिती केली आहे. सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या किमतीत व्यसन व मधुमेह आजराबरोबर शरीरातील इतर असाध्य आजार दूर करण्यास मदत झाली. आतापर्यंत याचा लाभ देशातील लाखो लोकांनी घेतला आहे. अनेक माता भगिनी यांनी 'नारीशक्ती अभियान' अंतर्गत असणाऱ्या आयुर्वेदिक उत्पादनाच्या मदतीने शारीरिक दृष्ट्या निरोगी,सुदृढ व मानसीक दृष्ट्या सक्षम बनण्यास मदत झाली.'नेत्रकक्षा अभियान' अंतर्गत लहानांपासून मोठ्यापर्यंत डोळ्यातील कमजोरी दूर होऊन हजारो रुग्णांनी डोळ्यांच्या आजारावर मात केली आहे.
याबरोबरच असाध्य असणारे मुतखडा,थायरॉइड, हृदयरोग या आजारावरती मात करून नागरिकांचे जीवन निरोगी बनेल व रोगमुक्त भारत होण्यास मदत होईल. आजारा बरोबर बेरोजगारी हा आपल्या देशाला लागलेला शाप असून तो वेळीच रोखला नाही गेला तर देशात अराजक माजेल. यासाठी न्यूट्रीस्टार कंपनीने बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी प्राप्त करून दिली असून याचा हजारो बेरोजगार,गरजू प्रतिनिधीनी घेतला असुन ते स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मानाने आपले जीवन जगत आहेत.अशाप्रकारे संस्थेने रोगमुक्तीबरोबरच बेरोजगारमुक्त भारत बनविण्याचा संकल्प केला असून समर्थांच्या आशीर्वादाने तो पूर्णत्वास नेण्याचा विश्वास चेअरमन प्रदीप कुंभार यांनी व्यक्त केला.
या कार्यशाळेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 35 प्रतिनिधींना सन्मानित करून त्यांचा गौरव केला.यावेळी या समर्थ संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन अभियानाच्या पुढील वाटचालीची माहिती दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक व गायक प्रल्हाद पाटील व आभार न्यूट्रीस्टार कंपनीचे मार्केटिंग प्रमुख ज्योतीराम सुतार यांनी मानले.यावेळी न्यूट्रीस्टार कंपनीचे प्रमुख सहकारी संदीप कुंभार,देवदास जाधव,भारत वरुटे,कृष्णात डवंग,उत्तम पाटील,विनायक गुरव,संजय गुरव यांचे सह दोनशे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰