भिलवडी दि. १० : निवडणूक होवून चार महिने झाले. परंतू हे सरकार जनतेची दखल घेत नाही साधी विचारपूसही करत नाही. मी सातत्याने आमदार म्हणून विधीमंडळात मतदारसंघासह जिल्ह्याचे प्रश्न मांडत आहे. सरकार कितीही चुकीचे वागत असले तरीसुद्धा पलूस कडेगांवच्या विकासासाठी मी आग्रही राहीन असा विश्वास आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी ग्रामस्थांना दिला.
धनगाव ता. पलूस येथे विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व पलूस तालुका काँग्रेसचे नेते महेंद्र लाड, जे.के. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून धनगाव ते खंडोबाचीवाडी रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ६ कोटी १० लाख याचे भूमीपूजन करण्यात आले. डीपीडीसीतून तलाठी कार्यालय बांधकाम दुरुस्ती यासाठी
१३ लाख रुपये देण्यात आले होते. त्याचे लोकार्पण डॉ.कदम यांच्याहस्ते झाले. आमदार कदम यांनी श्री कृष्ण महानुभव मठ जीर्णोध्दार करणेसाठी १० लाख रुपयांचा निधी यावेळी दिला.
डॉ.विश्वजीत कदम म्हणाले,
धनगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने मी कार्यरत राहणार आहे. समृद्ध धनगांव हेच आपले उद्दिष्ट आहे. सर्वांच्या सहकार्याने हे ध्येय नक्की गाठू असे आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी सांगितले.
सरपंच संदीप यादव, उपसरपंच हणमंत यादव, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह सतपाल साळुंखे, वसंतराव पवार, अधिक पाटील, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰