सांगली, दि. 10 ,(जि.मा.का.) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ज्या प्रयोजनासाठी भूखंडाचे वाटप करण्यात आलेले आहे, तो उद्योग चालू करण्याबाबत एक महिन्याच्या आत कार्यवाही करावी, अन्यथा भूखंडाचा पंचनामा करुन भूखंड बांधकामासह महामंडळाच्या ताब्यात परत घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. याची सांगली जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील बंद उद्योग घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून सांगली जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील बंद उद्योग घटकांची पाहणी करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने माहे मार्च २०२४ मध्ये बंद उद्योग घटकांना उद्योग चालू करण्याबाबत कळविण्यात आले होते. परंतु, अद्यापही काही उद्योग घटकांकडून भूखंडावर उद्योग चालू केल्याचे दिसून येत नाही. तसेच काही बंद उद्योग घटकामध्ये बेकायदेशीर कृत्य केल्याचे निदर्शसनास आलेले असून व भूखंडावर बेकायदेशीरपणे पोटभाडेकरू ठेवल्याचे निदर्शनास आलेले आहे. अशा उद्योग घटकांच्या बाबतीत कडक कारवाई करण्यात येणार असून, उद्योग घटकाचे मालक सर्वस्वी जबाबदार राहतील व पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.
अधिक माहितीसाठी प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग भवन, विश्रामबाग, सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰