वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांचे पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन...
व्हिडीओ
⬇️
सांगली दि. ०५ : सांगलीचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांची बदली करा अशा आशियाची बातमी सध्या वर्तमानपत्र सोशल मीडिया यावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. राजा दयानिधी यांनी जिल्हाधिकारी सांगली पदभार स्वीकारल्यापासून आपत्ती व्यवस्थापन नागरिकांना सुलभ पद्धतीने त्यांचे काम होण्याकरता योग्य कार्यप्रणाली राबवली गेली आहे तसेच नागरिकांच्या अडचणी सोडवण्याकरता ते जातीने स्वतः लक्ष घालतात. यामुळे त्यांनी आपल्या कामाचा ठसा प्रशासनावर उमटवला आहे. त्यांच्या या उत्तम प्रशासकीय करणारी प्रणालीमुळे बोगस कामाला प्रतिबंध लागला गेला आहे. परंतु काही राजकीय व्यक्ती या स्वतःच्या स्वार्थासाठी बोगस प्रकरणे तयार करून प्रशासनावर दबाव आणून प्रसंगी अधिकाऱ्यांची बदनामी करून आपले काम करून घेतात. परंतु जिल्हाधिकारी यांनी बोगस कामाला प्रतिबंध घातल्यामुळे काही भांडवलदारी व राजकीय व्यापारी यांचे बोगस अनियमित आस्थापना धोक्यात आले आहेत, आरोप करणारे सदर उद्योजक त्यांच्या कारखान्यामध्ये कोणता कायदा कितपत पाळला जातोय याची चौकशी करावी. कामगारांना साधे किमान वेतन, कंत्राटी कामगार कायदा, प्रदूषण कायदा, परप्रांतीय कायदा पाळला जात नाही. उलट मा. जिल्हाधिकारी यांनी यांच्या उद्योगांना या कायद्यातून बगल द्यावी म्हणुन हे उद्योजक दलित अधिकाऱ्यावर विनाकारण आक्षेप घेऊन त्यांच्या बदलीची मागणी करीत आहेत. पुढे जाऊन आम्हाला हे ही सांगावेसे वाटते की, सदर उद्योजक आपल्या कारखान्यामध्ये किती कायदे पाळतात आम्हाला माहीत नाही?
तरी आमची आपणांस नम्र विनंती आहे की सदर उद्योजकांनी बाबासाहेबांच्या संविधानाचा घोर अपमान केलेला आहे.
निवेदनामध्ये नमूद केलेल्या संबधित उद्योजकांच्या कारखान्यांमध्ये सर्व कायद्याचे पालन केले जाते का याची सखोल चौकशी व्हावी यामुळे ते नाहक जिल्हाधिकारी यांची बदनामी करत आहे तरी त्यांनी तात्काळ बदनामी थांबवावी व जिल्हाधिकारी यांना योग्य कामात साथ द्यावी. जिल्हाधिकारी अनुसूचित जाती जमातीचे असल्यामुळे काही जातीअंध लोक त्यांना त्रास देत आहेत. अशा लोकांवर ॲट्रॉसिटी कायदे अंतर्गत गुन्हे नोंद करून त्यांच्या उद्योगाची कायदेशीर चौकशी करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल वेळ पडल्यास आमरण उपोषणाला बसावे लागेल असा इशारा या निवेदनामध्ये देण्यात आला आहे.
यावेळी, पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे कार्याध्यक्ष जगदीश कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे सर, जिल्हा कोषाध्यक्ष हिरामण भगत, सांमिकु मनपा क्षेत्र अध्यक्ष युवराज कांबळे, सांगली शहर अध्यक्ष संगाप्पा शिंदे, कुपवाड शहर अध्यक्ष बंदेनवाज राजरतन, मिरज शहर अध्यक्ष इसाक सुतार, रियाज मुजावर, गणेश मासाळे, सलीम मुजावर, अनिल अंकलखोपे, गणपती जते, असलम मुल्ला, संदिप कांबळे, सुभाष पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰