भिलवडी दि. ०७ : भिलवडी तालुका पलूस येथील चितळे उद्योग समूहाचे सुप्रसिद्ध उद्योजक मा. कै. दत्तात्रय भास्कर तथा काकासाहेब चितळे यांचा पाचवा स्मृतिदिन उद्या शनिवारी ता. ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी विविध सामाजिक कार्यक्रमाने साजरा होत आहे.
यामध्ये --
◼️ जायंटस् ग्रुप, जायंटस् ग्रुप ऑफ सहेली, भिलवडी यांच्यावतीने सकाळी ८.०० ते ९.०० वा. भिलवडी येथे कृष्णाघाट स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
◼️ सकाळी ९.३० वा. प्रतिमा पुजन, डेअरी एन्टरन्स हॉल, मे.बी. जी. चितळे, भिलवडी स्टेशन येथे होईल.
◼️ सकाळी १०.०० वा. प्रतिमा पुजन, भास्कर बंगला, भिलवडी येथे होईल.
◼️ सार्वजनिक वाचनालय, भिलवडी यांच्यावतीने श्रीमती सुनिता चितळे बहिनी यांच्या हस्ते सकाळी १०.३० वा. काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येणार आहे.
◼️ नॅब नेत्र रुग्णालय, मिरज व जायंटस् ग्रुप ऑफ भिलवडी, जायंटस् ग्रुप ऑफ सहेली व माता बाल संगोपन केंद्र, माळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने. माता बाल संगोपन केंद्र, माळवाडी येथे सकाळी ११.०० ते दु. २.०० वा. पर्यंत नेत्र तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
◼️ सायंकाळी सायंकाळी ५.०० ते ६.०० या वेळेत सांगलीच्या सावली बेघर निवारा केंद्राचे संचालक मुस्तफा मुजावर यांची 'समाजसेवा' विषयावर प्रा. विठ्ठल मोहिते हे मुलाखत घेणार आहेत.
इ. विविध सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन केले असून या सर्व कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन काकासाहेब चितळे फाऊंडेशन , जायंटस् ग्रुप ,जायंटस् ग्रुप ऑफ सहेली व सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰