भिलवडी दि. ०६ : महानुभाव पंथीय परंपरेतील प्राचीन वारसा असलेल्या धनगांव ता.पलूस येथील श्रीकृष्ण मंदिराचा भव्य भूमिपूजन सोहळा शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक १० वा.संपन्न होणार आहे.
कवीश्वर कुळाचार्य आचार्य प्रवर प.पू. प. म.श्रीकारंजेकर बाबाजीमहानुभव,
अमरावती यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष प.पु.प.महंत श्रीविद्वांस बाबाजी शास्त्री,प.पु.प.महंत श्रीकापुस्तळनीकर बाबाजी महानुभाव फलटण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कृष्णा नदीच्या तीरावर साडेचारशे वर्षापूर्वी श्रीकृष्ण मठाची स्थापना करण्यात आली.महानुभाव पंथाचे अवतारी पुरूष श्री.गोविंद प्रभू यांच्या चरणस्पर्शाने पवित्र विशेष धनगांव येथील श्रीकृष्ण मठात स्थापित करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील स्थान महानुभाव संप्रदायात दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते.त्यानंतर दक्षिणेतील एकमेव मंडलिक स्थान म्हणून धनगांव येथील श्रीकृष्ण मठास आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
सांगली,सातारा,कोल्हापूर,सोलापूर,पुणे,गोवा,कर्नाटक येथील हजारो भाविक भक्त उपदेशी मंडळी दरवर्षी श्रीकृष्ण मंदिरात दर्शनासाठी येतात.
मुख्य मंदिर,सभामंडप,भक्त निवास,साधू निवास,ग्रंथालय,अभ्यासिका,सभागृह,उपहार कक्ष,कार्यालय आदी सुविधांचा जीर्णोद्धारात समावेश आहे.
खा.विशाल पाटील, आ. डॉ.विश्वजीत कदम, आ.अरुण आण्णा लाड,माजी खासदार संजय काका पाटील,माजी आमदार पृथ्वीराज देशमुख,सांगली परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ लाड,सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड आदींसह महानुभाव पंथातील महंत उपस्थित राहणार आहेत. मठाधिपती जयवंतबुवा बाळकृष्ण महानुभाव, पु.श्यामसुंदर जमोदेकर महानुभाव फलटण,श्रीकृष्ण महानुभाव जिर्णोद्धार कमिटीच्या वतीने सर्व भाविकांना या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰