yuva MAharashtra कै. काकासाहेबांच्या स्मृतिदिनी भिलवडी वाचनालयात रंगली एका सामाजिक कार्यकर्त्याची प्रेरणादायी मुलाखत

कै. काकासाहेबांच्या स्मृतिदिनी भिलवडी वाचनालयात रंगली एका सामाजिक कार्यकर्त्याची प्रेरणादायी मुलाखत




भिलवडी दि. ०९ : पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालयाचे भूतपूर्व अध्यक्ष, प्रसिद्ध उद्योगपती द.भा.तथा काकासाहेब चितळे यांचा पाचवा स्मृतिदिन भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.


श्रीमती सुनिता चितळे यांच्या हस्ते काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे,मकरंद चितळे,सौ.भक्ती चितळे,विश्वस्त जी.जी.पाटील,कार्यवाह सुभाष कवडे,सर्व संचालक सभासद वाचक व पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.



सायंकाळच्या सत्रात सावली बेघर निवारा केंद्र सांगली या संस्थेचे प्रमुख संचालक मुस्तफा मुजावर यांची मराठी अध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल मोहिते यांनी समाजसेवा या विषयांवर प्रदीर्घ मुलाखत घेतली.यावेळी मुस्तफा मुजावर यांनी आपले अनुभव कथन केले.


मी देखील प्रारंभी गुन्हेगार क्षेत्रात वावरत होतो परंतु समाजातील अनाथ लोकांना पाहून माझे मन परिवर्तित झाले व मी आयुष्यभर अनाथांसाठी कार्यरत राहिलो.भविष्यात अनाथासाठी स्मृतीगंध सेवालय ही वास्तू उभारून अनाथांसाठी मायेची ऊब देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.


          सावली बेघर निवारा केंद्र सांगली , 
          प्रमुख संचालक मुस्तफा मुजावर

यावेळी काकासाहेब चितळे यांच्या स्मरणार्थ वाचनालयाचे पदाधिकारी व सभासदांनी अकरा हजार रुपये मदत निधी संकलित करून तर काकासाहेब चितळे फाऊंडेशनच्या वतीने अकरा हजार असा एकूण बावीस हजार रुपयांचा मदत निधी गिरीश चितळे यांच्या हस्ते सावली अनाथ बेघर निवारा केंद्रास मदत म्हणून मुस्तफा मुजावर यांच्याकडे सुफुर्द करण्यात आला.


मुस्तफा मुजावर यांच्याकडे मदत निधी देताना गिरीश चितळे,सुभाष कवडे, प्रा.विठ्ठल मोहिते.

स्वागत व प्रास्ताविक वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी केले. डी.आर.कदम यांनी आभार मानले.यावेळी कवी अभिजित पाटील,जयंत केळकर,महावीर वठारे,महावीर चौगुले,रमेश पाटील,एम.टी. देसाई,पुरुषोत्तम जोशी आदींसह वाचनालयाचे सभासद,वाचक,सेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰