पलूस दि. १५ : बातमी लावल्याचा राग मनात धरून खानापूर तालुक्यातील विटा शहरातील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्या न्यूज चॅनेलच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर काही हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला.
या हल्ल्यात पिसाळ हे गंभीर जखमी झाले. यावेळी पिसाळ यांच्या कार्यालयातील एका महिला कर्मचारी यांनी पिसाळ यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनाही हाल्लेखोरांनी मारहाण केली.
या घटनेचा कुंडल ता. पलूस येथील सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले यांनी जाहिर निषेध केला व संबधित हल्लेखोरांच्यावर कडक कारवाई करावी व या घटने पाठीमागचा जो कोणी आका आहे त्याचा देखील पोलीसांनी शोध घेऊन त्यांच्यावरही कडक कारवाई करावी.. तसेच सरकारने तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावनी करावी....
अशा मागणीचे निवेदन पलूसचे निवासी नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉक्टर आस्मा मुजावर यांना दिले आहे..